Viral Video: भाजप नेत्याच्या मुलाची गुंडगिरी; वृद्ध व्यक्तीला घरात घुसून मारहाण; पाहा व्हिडिओ
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: भाजप नेत्याच्या मुलाची गुंडगिरी; वृद्ध व्यक्तीला घरात घुसून मारहाण; पाहा व्हिडिओ

Viral Video: भाजप नेत्याच्या मुलाची गुंडगिरी; वृद्ध व्यक्तीला घरात घुसून मारहाण; पाहा व्हिडिओ

Updated Jul 26, 2024 07:37 PM IST

Indira Singh Son Viral Video: भाजप नेत्याच्या मुलाने वृद्ध व्यक्तीच्या घरात घुसून त्यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

भाजप नेत्याच्या मुलाचा वृद्ध व्यक्तीला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल
भाजप नेत्याच्या मुलाचा वृद्ध व्यक्तीला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल

Indira Singh son Beats Elderly Man: उत्तर प्रदेशमधील बिजनौर येथील भाजप नेत्याच्या डॉक्टर मुलाचा गुंडगिरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात तो एका वृद्ध व्यक्तीला मारहाण करत असल्याचे दिसत आहे. मुलाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बिजनौर सदरच्या अध्यक्ष आणि भाजप नेत्या इंदिरा सिंह यांच्याकडेही बोट दाखवण्यात आले. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, भाजप नेत्या इंदिरा सिंह यांचा मुलगा डॉ. अभिनव हा वृद्धाच्या घरात घुसून त्यांच्याशी वाद घालतो आणि काही क्षणातच त्यांच्या कानशिलात मारतो. आरोपीने दोन वेळा वृद्धाच्या कानशिलात लगावली आणि मध्यस्थी करण्यासाठी पुढे आलेल्या त्यांच्या पत्नीसोबतही गैरवर्तन केले.

व्हिडिओमध्ये काही गोष्टी ऐकू येत आहेत, ज्यात अभिनव सिंह वृद्धाला म्हणतोय की, शांतपणे उभे राहा, आवाज काढू नको, मी दहापर्यंत मोजणार…! आणि नंतर त्यांच्या कानशिलात मारतो. अभिनव सिंहच्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेत्या इंदिरा सिंह यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली.

इंदिरा सिंह म्हणाल्या की, 'मी काही कामासाठी बाहेर गेले होते आणि परत आल्यानंतर या घटनेबाबत मला समजले. ही दुःखद घटना आहे. मारहाण झालेला वृद्ध आमचे नातेवाईक आहे. कौटुंबिक वादातून असे घडले, पण असे व्हायला नको होते.' वृद्ध व्यक्तीने आपल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, 'अभिनवने मला ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि पत्नीसोबतही गैरवर्तन केले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, याबाबत पोलिसांनी कोणती कारवाई केली, हे अद्याप समजू शकलेले नाही.

नेटकऱ्यांची संतापजनक प्रतिक्रिया

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, 'या व्यक्तीला त्याच्या पावरची जाणीव असल्यामुळेच त्याने वृद्धाला मारहाण केली.' दुसऱ्याने लिहिले आहे की, 'मला वाटत नाही, या व्यक्तिविरोधात कोणतीही कारवाई केली जाईल. त्याच्या घरावर बुलडोझर चालणार नाही. त्याला अटक होणार नाही. पोलीस इतके प्रमाणिक आहेत का?' आणखी एका युजरने लिहिले आहे की, 'कुणाच्या घरात घुसून मारणे इतके सोपे आहे? या देशात कायदा सर्वांना समान आहे असे मला वाटत नाही.'

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर