वक्फ कायद्याचे समर्थन करणारे भाजप नेते अस्कर अली यांचं घर जमावाने पेटवलं
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  वक्फ कायद्याचे समर्थन करणारे भाजप नेते अस्कर अली यांचं घर जमावाने पेटवलं

वक्फ कायद्याचे समर्थन करणारे भाजप नेते अस्कर अली यांचं घर जमावाने पेटवलं

HT Marathi Desk HT Marathi
Published Apr 07, 2025 09:40 AM IST

waqf law : वक्फ दुरुस्ती कायद्याविरोधात इम्फाळ खोऱ्यातील विविध भागात निदर्शने करण्यात आली. या रॅलीत पाच हजारांहून अधिक लोक सहभागी झाले होते, त्यामुळे लिलोंग येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १०२ वरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

Waqf
Waqf (Pixabay)

waqf law : भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक शाखेच्या मणिपूर शाखेचे अध्यक्ष अस्कर अली यांच्या घराला रविवारी रात्री जमावाने आग लावली. अस्कर अली यांनी वक्फ दुरुस्ती कायद्याचे समर्थन केल्याने जमावाने त्यांचे घर पेटवून दिल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. थौबल जिल्ह्यातील लिलोंग येथे ही घटना घडली आहे. अलीयांनी शनिवारी सोशल मीडियावर सीएएला पाठिंबा दर्शविला.

रात्री नऊच्या सुमारास संतप्त जमावाने त्यांच्या घराबाहेर जमून तोडफोड केली आणि नंतर घराला आग लावली. या घटनेनंतर अलीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यात अली यांनी त्यांच्या आधीच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली होती. या कायद्याला त्यांनी विरोध दर्शवला.

वक्फ दुरुस्ती कायद्याविरोधात इम्फाळ खोऱ्यातील विविध भागात निदर्शने करण्यात आली. या रॅलीत पाच हजारांहून अधिक लोक सहभागी झाले होते, त्यामुळे लिलोंग येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १०२ वरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी संसदेने मंजूर केलेल्या वक्फ (दुरुस्ती) विधेयक २०२५ ला मंजुरी दिली. मुर्मू यांनी मुस्लिम वक्फ (रद्द) विधेयक-२०२५ लाही मंजुरी दिली. यामुळे आता स्वातंत्र्यपूर्व मुस्लिम वक्फ कायदा रद्द करण्यात आला आहे.

वक्फ बोर्डात पारदर्शकता वाढविण्यासह अनेक महत्त्वाच्या तरतुदी असलेल्या वक्फ दुरुस्ती विधेयक २०२५ ला राज्यसभेने प्रदीर्घ चर्चेनंतर ९५ विरुद्ध १२८ मतांनी मंजुरी दिली होती. गुरुवारी लोकसभेत हे विधेयक मंजूर करण्यात आले असून २८८ सदस्यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला असून २३२ सदस्यांनी विरोध केला आहे.

संसदेने मुस्लिम वक्फ (रद्द) विधेयकाला ही मंजुरी दिली असून राज्यसभेनेही त्याला मंजुरी दिली आहे. लोकसभेने या विधेयकाला यापूर्वीच मंजुरी दिली आहे. राष्ट्रपतींच्या मान्यतेनंतर त्याचे कायद्यात रूपांतरही झाले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर