Viral Video: भाजप नेत्याचं तरुणीसोबत अश्लील कृत्य, व्हिडिओ काढून स्वत:च इंन्स्टाग्रामवर केला पोस्ट!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: भाजप नेत्याचं तरुणीसोबत अश्लील कृत्य, व्हिडिओ काढून स्वत:च इंन्स्टाग्रामवर केला पोस्ट!

Viral Video: भाजप नेत्याचं तरुणीसोबत अश्लील कृत्य, व्हिडिओ काढून स्वत:च इंन्स्टाग्रामवर केला पोस्ट!

Nov 11, 2024 02:02 PM IST

BJP Leader Obscene Video: भाजप नेत्याचा एका तरुणीसोबत अश्लील कृत्य करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडिओ: भाजप नेत्याचं तरुणीसोबत अश्लील कृत्य
व्हायरल व्हिडिओ: भाजप नेत्याचं तरुणीसोबत अश्लील कृत्य

BJP Leader Viral News: काँग्रेस जिल्हाध्यक्षांनंतर आता उत्तर प्रदेशच्या कानपूर येथील भाजपच्या नेत्याचा एका तरुणीसोबत अश्लील कृत्य करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत भाजप नेता नको त्या अवस्थेत दिसत आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ माजली. हा व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहोचताच त्यांनी संबंधित भाजप नेत्याला तुरुंगात टाकले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या नेत्याने स्वतः तरुणीसोबतचा व्हिडिओ सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केला.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी सरकार, सरकार आणि प्रशासनावर निशाणा साधण्यास सुरुवात केली. यानंतर कानपूर पोलीस सक्रिय झाले आणि त्यांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. आयपीएस अंकिता शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलदीप भदौरिया असे भाजप नेत्याचे नाव आहे. कुलदीपने एका तरुणीसोबतचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात समाजात अश्लीलता पसरवल्याप्रकरणी गुजैनी पोलीस ठाण्यात कलम ७७, २९४ पीएनएस आणि कलम ६४ ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले.याप्रकरणी पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.

भाजप नेत्याचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. एकाने म्हटले आहे की, 'अशा लोकांना समाजात राहण्याची गरज नाही, त्यांना तुरुंगातच ठेवले पाहिजे आणि त्यांना तेथे व्हीआयपी वागणूक मिळणार नाही, याचीही काळजी घ्या.' दुसऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की, ‘लोकांमध्ये एवढी हिंमत कुठून येते की ते तरुणींसोबतचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतात? अशा लोकांना धडा शिकवलाच पाहिजे.’

काँग्रेस जिल्हाध्यक्षांचे लज्जास्पद कृत्य

यूपीच्या बागपत जिल्ह्यातील काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या लज्जास्पद कृत्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष एका मुलीला प्रायव्हेट पार्ट दाखवताना आणि तिच्यासोबत अश्लील कृत्य करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रदेश काँग्रेस हायकमांडने युनूस चौधरी यांच्याविरोधात कारवाई करत त्यांना पदावरून हटवले. डॉ. युनूस चौधरी काँग्रेस जिल्हाध्यक्षांचे नाव आहे. व्हिडिओत मुलगी हे चुकीचे असल्याचे सांगताना दिसत आहे. माझी आई आली तर ती मला मारून टाकेल, असे ती बोलत आहे. तरी युनूस चौधरी तिला इकडे ये असे म्हणतात. यानंतर ती मुलगी पुन्हा म्हणते की, यार प्लीज आत्ता नको. तरीही डॉ. युनूस चौधरी तिच्यावर जबरदस्ती करताना दिसत आहेत.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर