Bjp manifesto : जम्मू-काश्मीरमध्ये 'लाडकी बहीण' योजना; जम्मू-काश्मीरसाठी भाजपचा २५ कलमी जाहीरनामा-bjp launches 25 point poll manifesto for jammu kashmir assembly elections ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Bjp manifesto : जम्मू-काश्मीरमध्ये 'लाडकी बहीण' योजना; जम्मू-काश्मीरसाठी भाजपचा २५ कलमी जाहीरनामा

Bjp manifesto : जम्मू-काश्मीरमध्ये 'लाडकी बहीण' योजना; जम्मू-काश्मीरसाठी भाजपचा २५ कलमी जाहीरनामा

Sep 06, 2024 10:54 PM IST

BJP Manifesto For Jammu Kashmir Election : जम्मू-काश्मीरमध्ये सत्तेत आल्यास प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ महिलेला 'मां सन्मान योजने'अंतर्गत दरवर्षी १८ हजार रुपये देण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे.

जम्मू काश्मीर विधानसभेसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध
जम्मू काश्मीर विधानसभेसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध (PTI)

 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी आज जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी (Jammu-Kashmir Assembly Election 2024) भाजपचा २५ कलमी जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये प्रत्येक कुटूंबातील ज्येष्ठ महिलेला प्रतिवर्षी १८००० हजार रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. यावेळी अमित शहा यांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या जाहीरनाम्याचाही उल्लेख करत कलम ३७० इतिहासजमा झाले असून, आता कधीही परत येऊ शकणार नाही आणि आम्ही ते परत येऊ देणार नाही, असे ठणकावून सांगितले.  

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाने आगामी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा शुक्रवारी जाहीर केला. जम्मू-काश्मीरमध्ये सत्तेत आल्यास प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ महिलेला 'मां सन्मान योजने'अंतर्गत दरवर्षी १८ हजार रुपये देण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. प्रगती शिक्षा योजनेअंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता म्हणून दरवर्षी तीन हजार रुपये देण्यात येणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाने आगामी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा शुक्रवारी जाहीर केला. यावेळी जम्मू-काश्मीर भाजपचे अध्यक्ष रवींद्र रैना आणि पक्षाचे इतर नेते उपस्थित होते.

जाहीरनामा प्रसिद्ध करताना अमित शहा म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर जम्मू-काश्मीरचा मुद्दा आमच्या पक्षासाठी महत्त्वाचा राहिला आहे आणि आम्ही नेहमीच हा प्रदेश भारतासोबत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पंडित प्रेमनाथ डोगरा यांच्या संघर्षापासून ते श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदानापर्यंत हा लढा आधी जनसंघाने आणि नंतर भाजपने पुढे नेला कारण जम्मू-काश्मीर हा नेहमीच भारताचा भाग राहिला आहे आणि राहील, असा आमचा विश्वास आहे.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी या भागातील दहशतवाद आणि फुटीरतावादाच्या प्रदीर्घ मुद्द्यांकडे लक्ष वेधले आणि सांगितले की, जम्मू-काश्मीरला २०१४  पर्यंत विविध राज्य आणि राज्येतर घटकांकडून अस्थिरतेचा सामना करावा लागला.

जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती हाताळण्यासाठी इतर सर्व सरकारांनी तुष्टीकरणाचे राजकारण केले. मात्र, भारत आणि जम्मू-काश्मीरचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा २०१४ ते २०२४ हा काळ सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, असे शहा म्हणाले.

नॅशनल कॉन्फरन्सचा जाहीरनामा आणि मित्रपक्ष कॉंग्रेसच्या मूक पाठिंब्यावर टीका करताना अमित शहा म्हणाले की, कलम ३७० हा इतिहास आहे, तो कधीच परत येणार नाही आणि आम्ही तसे होऊ देणार नाही.

भाजपच्या जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे -

  • कलम ३७० ही तरुणांच्या हातात शस्त्रे आणि दगड देणारी गोष्ट होती. ते परत येणार नाही.
  • जम्मू-काश्मीरमध्ये सत्तेत आल्यास 'मां सन्मान योजने'अंतर्गत प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ महिलेला दरवर्षी १८ हजार रुपये देण्याचे आश्वासन.
  • उज्ज्वला योजनेअंतर्गत आम्ही वर्षाला दोन सिलिंडर मोफत देणार आहोत. प्रगती शिक्षा योजनेअंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता म्हणून दरवर्षी तीन हजार रुपये देण्यात येणार आहेत.
  • जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाचे समूळ उच्चाटन भाजप करेल. 
  • दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना टॅबलेट किंवा लॅपटॉप देण्यात येणार आहेत, तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रगती शिक्षा योजनेअंतर्गत वार्षिक तीन हजार रुपये प्रवास भत्ता मिळणार आहे.
  • जम्मू शहरात आयटीसाठी विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड), श्रीनगरमध्ये मनोरंजन पार्क आणि गुलमर्ग आणि पहलगामचा आधुनिक पर्यटन स्थळे म्हणून विकास हे केंद्रशासित प्रदेशातील आर्थिक विकास आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचे प्रमुख घटक असतील.
  • अहमदाबादच्या साबरमती रिव्हरफ्रंटच्या धर्तीवर जम्मूतील तावी रिव्हरफ्रंट विकसित करणे आणि श्रीनगरमधील डल सरोवराभोवती वॉटर स्पोर्ट्स आणि पर्यटनाला चालना देणे.
  • छोटे व्यापारी आणि एमएसएमईसाठी भाजपने जमीन प्रवेश, युटिलिटी सर्व्हिसेस आणि लीज डीडच्या सध्याच्या समस्या सोडविण्याचे वचन.
  • थकीत वीज आणि पाणी बिलातून सवलत, पंतप्रधान सूर्य घर मुफ्त बिजली योजनेअंतर्गत मोफत वीज आणि 'हर घर नल से जल' योजनेतून पिण्याचे पाणी देण्याचे आश्वासन.
  • वयोवृद्ध, विधवा आणि अपंगांना पेन्शन एक हजार रुपयांवरून तीन हजार रुपयांपर्यंत तिप्पट करण्याचा संकल्प भाजपने केला आहे.
  • आयुष्मान भारत आरोग्य योजनेचा विस्तार करणे, कव्हरेज मध्ये अतिरिक्त २ लाख रुपयांची वाढ करणे आणि सरकारी महाविद्यालयांमध्ये १,००० नवीन वैद्यकीय जागा जोडण्याचे आश्वासन देणे, परवडणाऱ्या आरोग्यसेवेबद्दलची आपली बांधिलकी दर्शविते.
  • पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या देयकात ४,००० रुपयांची वाढ करणे, एकूण वार्षिक लाभ १०,००० रुपयांपर्यंत आणणे. 
  • कृषी कामांसाठी च्या वीज दरात ५० टक्क्यांपर्यंत कपात करण्यात येणार असून 'हर टनेल तेज पहल' योजनेअंतर्गत १० हजार किलोमीटरचे नवे ग्रामीण रस्ते बांधण्याची योजना जाहीरनाम्यात समाविष्ट करण्यात आली आहे.
  • टीकालाल टपलू विस्थापित समाज पुनर्वस योजनेअंतर्गत काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन.
  • पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील निर्वासित आणि वाल्मिकी आणि गोरखा समुदायांसारख्या अंतर्गत उपेक्षित गटांना मदत.
  • जम्मू-काश्मीरमधून बेकायदा रोहिंग्या आणि बांगलादेशी वस्त्या हटविण्याची एकत्रित मोहीम ही भाजपच्या योजनेतील आणखी एक प्राथमिकता आहे.

Whats_app_banner