तेलंगणामध्ये भव्या विजयानंतर काँग्रेस राज्यात सरकार स्थापन करणार आहे. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष रेवंत रेड्डी विजयाचे नायक ठरले आहेत तर भाजपचे कटिपल्ली वेंकट रमण रेड्डी नवे बाहुबली. भाजपच्या या उमेदवाराने तेलंगणाचे विद्यमान मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या बरोबरच भावी मुख्यमंत्री म्हणून चर्चा सुरू असलेले रेवंत रेड्डी दोघांनाही पराभूत करण्याचा कारनामा केला आहे.
कटिपल्ली वेंकट रमण रेड्डीयांच्या विजयावर केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजूयांनी सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्सवर त्यांचाफोटो पोस्टकरत लिहिले आहे की, या ग्रेटमॅनच्या विजयाची चर्चा झाली पाहिजे. भाजपच्या कटिपल्ली वेंकट रमनायांनी कामारेड्डी विधानसभा मतदारसंघात तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आणि काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार रेवंत रेड्डी दोघांना पराभूत केले. हा एक मोठा विजय आहे, ज्याची पाहिजे तितकी चर्चा होताना दिसत नाही.
उत्तर तेलंगणा राज्यात येणाऱ्या कामारेड्डी जागेवर मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि पुन्हा रेवंत रेड्डी यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर या मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरू होती. दोन दिग्गज नेत्यांच्या मुकाबल्यात भाजपच्या कटिपल्ली वेंकट रमण रेड्डी यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी तीन हजाराहून अधिक मतांनी विद्यमान सीएम केसीआर यांनी हरवले तर रेवंत रेड्डी तिसऱ्या स्थानावर राहिले. २०१८ च्या निवडणुकीत या मतदारसंघात बीआरएसचे उमेदवार गम्पा गोर्वधन यांनी विजय मिळवला होता. त्यांनी काँग्रेसचे मोहम्मद अली शब्बीर यांचा पराभव केला होता. कामरारेड्डी विधानसभा मतदारसंघ निजामाबाद जिल्ह्यात येतो. त्यापूर्वी २०१४ च्या निवडणुकीत येथे काँग्रेस विजयी झाली होती. मात्र २०२३ मध्ये या जागेवर भाजपने कब्जा केला आहे.
कोण आहेत कटिपल्ली वेंकट रमण रेड्डी?
५३ वर्षीय कटिपल्ली वेंकट रमण रेड्डी व्यावसायिक आहेत. त्यांनी केवळ १२ वी पर्यंत शिक्षण घेतले आहे. निवडणूक अर्जात घोषित केलेल्या संपत्ती विवरणानुसार त्यांच्याकडे जवळपास ५० कोटी रुपयांची संपत्ती आहे. व्यावसायिक ते राजकीय नेते बनलेल्या रेड्डी यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह भावी मुख्यमंत्र्यांनी पराभूत करून राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे.रेड्डी यांच्यावर ११ गुन्हे दाखल आहेत. त्यांनी कामारेड्डी विधानसभा मतदारसंघात अनेक शाळा व रुग्णालये सुरू केली आहेत. याच कारणामुळे त्यांनी दिग्गज नेत्यांवर मात केली आहे. ते बीजेपी कामारेड्डी विधानसभेचे प्रभारी व निजामाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्षही राहिले आहेत.
कामारेड्डी विधानसभा मतदारसंघात जायंट किलर ठरलेल्या वेंकट रमण रेड्डी यांच्या विजयामध्ये सोलपूरच्या एका तरुणाचा मोलाचा वाटा आहे.सचिन कल्याण शेट्टीं असे त्याचे नाव आहे. प्रचार प्रमुखपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर कल्याण शेट्टी यांनी कामारेड्डी मतदारसंघात तब्बल दोन महिने तेथेच तळ ठोकला होता. याकाळात त्यांनी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी,सभा घेत पूर्ण प्रचार यंत्रणा राबविली होती. त्यामुळे रेड्डी यांचा आज झालेल्या विजयामध्ये कल्याणशेट्टी यांनी वेंकट रमण रेड्डी विजयी करत जायंट किलर ठरवले आहे.
संबंधित बातम्या