भाजपने मेरठ लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा खासदार बनलेले राजेंद्र अग्रवाल यांचे तिकीट कापून टीव्ही मालिका रामायणमधील राम अरुण गोविल यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. अरुण गोविल यांचे नाव मागील तीन आठवड्यापासून उमेदवारीसाठी चर्चेत होते. मात्र स्थानिक नेत्यांनी याला विरोध दर्शवला होता. आता प्रश्न उपस्थित होत आहे की, अखेर विजयाची हॅटट्रिक करणारे राजेंद्र अग्रवाल यांच्या जागी अरुण गोविल यांना का उतरवले आहे. मात्र येथेही विजयाची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे.
भाजपने आज आपली पाचवी उमेदवारी यादी जाहीर केली. यामध्ये १११ उमेदवारांची नावे जाहीर केली. यात अभिनेत्री कंगणा राणावत हिच्यासोबतच छोट्या पडद्यावर 'श्रीरामाची' भूमिका साकारणारा अभिनेता अरुण गोविल यांनाही तिकीट दिली आहे.
Lok Sabha Election: कंगना ‘मंडी’तून लोकसभेच्या मैदानात! भाजपकडून सोलापूरसह राज्यातील ३ जागांवर उमेदवारांची घोषणा
टीव्ही मालिका रामायणचे राम अरुण गोविल यांचे मेरठशी नाते राहिले आहे. अरुण गोविल यांचा जन्म १२ जानेवारी १९५२ रोजी मेरठमधील अग्रवाल कुटूंबात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव चंद्रप्रकाश गोविल होते. त्यांचे वडील नगरपालिकेत जलविभागात अभियंता होते. अरुण यांच्या आईचे नाव शारदा देवी होते त्या गृहिणी होत्या.
अरुण गोविल यांचे पाच भाऊ व दोन बहिणी होत्या. कॉलेजनंतर अरुण गोविल करिअरसाठी मुंबईला गेले. तेथे ते आपला भाऊ विजय गोविल यांच्याकडे राहिले. त्यांची वहिणी तबस्सुम फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नाव होते. अनेक चित्रपटात काम केल्यानंतर रामानंद सागर यांनी रामायणमधील ‘राम’ भूमिकेसाठी अरुण गोविल यांना निवडले. त्यानंतर ते राम नावाने प्रसिद्ध झाले.
राजेंद्र अग्रवाल यांच्यामुळेच भाजपने २००९ मध्ये ही जाहा बसपाकडून हिसकावून घेतली होती. २००४ मध्ये बसपाचे शाहिद अखलाक येथे खासदार होते. त्यानंतर २०१४ मध्येही राजेंद्र अग्रवाल यांनी दुसऱ्यांना विजय मिळवला. २०१९ मध्ये त्यांनी विजयाची हॅटट्रिक केली. मात्र आता २०२४ मध्ये राजेद्र अग्रवाल यांच्या जागी’ अरुण गोविल यांना तिकीट दिली आहे.