Narendra Modi cabinet Full List: नरेंद्र मोदी आज सायंकाळी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी आपल्या निवासस्थानी कॅबिनेटमध्ये सामील होणाऱ्या संभाव्य मंत्र्यांशी चाय पे चर्चा केली. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार एकूण ४३ मंत्री आज शपथ घेणार आहेत. ४३ नेत्यांना राष्ट्रपती भवनातून औपचारिकरित्या शपथ ग्रहण समारंभासाठी फोन आला आहे. भाजप ३२ मंत्रिपदे आपल्याकडे ठेऊ शकते. तर टीडीपी व जनता दलाच्या वाट्याला दोन-दोन मंत्रिपदे येण्याची शक्यता आहे.
२०१४ नंतर पहिल्यांदाच ५४३ सदस्यांच्या लोकसभेत भारतीय जनता पक्षाला २७२ जागांचा आकडा गाठण्यात अपयश आले. आजच्या शपथविधीत तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) आणि जनता दल (युनायटेड) किंवा जनता दल (सेक्युलर) चे प्रत्येकी दोन सदस्य आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) इतर आठ घटक पक्षांचा प्रत्येकी एक सदस्य रविवारी नव्या सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेणार आहे.
टीडीपी १६ खासदारांसह आणि जेडीयू १२ खासदारांसह एनडीएचा दुसरा आणि तिसरा सर्वात मोठा घटक पक्ष म्हणून उदयास आला.
शपथविधी सोहळ्याच्या काही तास आधी तेलुगू देसम पक्षाचे नेते जयदेव गल्ला यांनी राम मोहन नायडू (३६) आणि चंद्रशेखर पेम्मासानी (४८) यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपद देण्याची घोषणा केली. माजी खासदार गल्ला यांनी गुंटूरमधून डॉक्टर ते राजकारणी बनलेले पेम्मासानी आणि तीन वेळा खासदार आणि प्रशिक्षणाने इंजिनिअर राहिलेले राम मोहन नायडू यांचे अभिनंदन केले.
मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या आमदारांना सकाळी ११ वाजता पंतप्रधान निवासस्थानी चहापानासाठी आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये जदयूचे लल्लन सिंह आणि रामनाथ ठाकूर, शिवसेनेचे प्रतापराव जाधव, राष्ट्रीय लोकदल (रालोद), जनशक्ती पार्टी (रामविलास) किंवा लोजपा (आरव्ही) चे चिराग पासवान, जनता दल (सेक्युलर) चे एचडी कुमारस्वामी, आजसू पक्षाचे चंद्र प्रकाश चौधरी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले, अपना दल (सोनेलाल) च्या अनुप्रिया पटेल आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे जीतनराम मांझी यांचा समावेश आहे.
१९६० मध्ये जन्मलेले जाधव महाराष्ट्र बुलढाण्यातून पुन्हा निवडून आले आहेत. ते तीन वेळा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य राहिले (१९९५-२००९). जाधव पहिल्यांदा २००९ मध्ये लोकसभेवर निवडून गेले होते. २०१४ व २०१९ मध्येही त्यांनी विजय मिळवला होता. ग्रामविकास व पंचायतराज व दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विषयक स्थायी समित्यांचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
मांझी (७९) आणि कुमारस्वामी (६४) हे शपथ घेणार असून अनुक्रमे बिहार आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आहेत. मांझी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "मी आज दुपारी पंतप्रधान @narendramodi जी यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहे. गया आणि बिहारच्या जनतेसाठी ही आनंदाची बातमी आहे. जय मगध, जय बिहार।
डिसेंबर २०२३ पर्यंत जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले ६९ वर्षीय राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह आणि बिहारचे माजी मंत्री आणि राज्यसभेचे सदस्य रामनाथ ठाकूर हे बिहारचे आणखी दोन मंत्री शपथ घेणार आहेत.
राज्यसभेचे सदस्य जयंत चौधरी, ४१ वर्षीय चिराग पासवान आणि ५६ वर्षीय चंद्रप्रकाश चौधरी यांचा पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. आठवले (६४) आणि अनुप्रिया पटेल (४३) हे आधीच्या एनडीए सरकारमध्ये मंत्री होते.
संबंधित बातम्या