राजद नेते वबिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर भारतीय जनता पक्षाने खळबळजनक आरोप केले आहेत. सरकारी निवासस्थानातून पाण्याच्या तोट्या (नळ),एसी आणि इतर वस्तू चोरल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यामुळे बिहारचे राजकारण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) नेते तेजस्वी यादव यांनी दोन दिवसांपूर्वी पाटणा येथील ५, देशरत्न मार्ग येथील सरकारी बंगला रिकामा केला होता.
आता हा बंगला उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना देण्यात आला असून ते येत्या विजयादशमीला घरात प्रवेश करणार आहेत. भाजपचा आरोप आहे की, जेव्हा सम्राट यांची टीम बंगल्यात पोहोचली तेव्हा तिथे भांडी, एसी, सोफा, पाण्याचे नळ यासारख्या अनेक वस्तू गायब होत्या.
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर भारतीय जनता पक्षाने सरकारी निवासस्थानातून एसीसह अनेक वस्तू चोरल्याचा आरोप केला आहे. यामुळे बिहारचा राजकीय पारा तापला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी दोन दिवसांपूर्वी पाटण्यातील ५, देशरत्न मार्गावरील बंगला रिकामा केला होता. आता हा बंगला उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना देण्यात आला आहे.
भाजपचा आरोप आहे की, सम्राटची टीम बंगल्यावर पोहोचली तेव्हा बंगल्यातील भांडी, एसी, सोफा अशा अनेक गोष्टी गायब आढळल्या. तसेच वॉश बेसिन आणि नळ तुटले होते. तेजस्वी यांचे मेहुणे आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी २०१७ मध्ये निवडणूक हरल्यानंतर योगी आदित्यनाथ यांच्यासाठी मुख्यमंत्रिपदरिकामेकेले होते, तेव्हा भाजपने त्यांच्यावर असेच आरोप केले होते.
५, देशरत्न मार्गावरील सरकारी निवासस्थान रिकामे करताना तेजस्वी यादव यांनी एसी, खुर्ची, पाण्याची टाकी, तोच्या अशा अनेक गोष्टी उखडून टाकल्याचा आरोप भाजपचे मीडिया प्रभारी दानिश इक्बाल यांनी केला आहे. अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशात जे केले, तेच तेजस्वी यांनी येथेही केले आहे. जेडीयूचे प्रवक्ते नीरज कुमार यांनीही तेजस्वी यांच्यावर निशाणा साधत सरकारी मालमत्ता हिसकावून घेणे हा कोणता राजकीय संस्कार आहे, असे म्हटले आहे.
दरम्यान, राजदने हे आरोप फेटाळून लावले आहेत. राजद प्रवक्ते मृत्युंजय तिवारी यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री असताना त्यांना हा बंगला मिळाला होता. त्यांनी हा बंगला आता रिकामा केला आहे. भाजपला तेजस्वी यांची भीती वाटते, म्हणूनच ते असे क्षुद्र राजकारण करत असल्याची टीकाही राजदने केली आहे.
संबंधित बातम्या