Bird Flu : केरळमध्ये बर्ड फ्लू वेगाने पसरल्यानंतर उत्तराखंड राज्यातही अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तराखंडमधील सर्व १३ जिल्ह्यातील विविध पक्षांचे ५०-५० नमुने तपासणीसाठी गोळा केले जात आहे. सँपल गोळा केल्यानंतर ते रुद्रपूर येथील पशु रोग संशोधन प्रयोगशाळेच्या माध्यमातून भोपाळमधील हाय सिक्यिरिटी एनिमल डिजीज लॅबमध्ये पाठवले जातील.
एव्हियन इन्फ्लूएंझा (H5N1) विषाणू सर्व प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजातींमध्ये पसरू शकतो. केरळमध्ये बदकांमध्ये एव्हियन इन्फ्लूएंझा विषाणू आढळल्यानंतर आता उत्तराखंडमध्येही अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सँपल तपासणीत पक्षांमध्ये व्हायरलची पुष्टी होते. त्यानंतर त्याच्या एक किलोमीटर परिसरातील पक्षांना मारले जाते. केरळ राज्यातील अलाप्पुझा जिल्ह्यात बदकांमध्ये बर्ड फ्लू झाल्याचे समोर आले आहे. पशुपालन विभागानुसार एवियन इन्फ्लूएंजा (एच-5एन-1) व्हायरस कोंबड्या, कबूतर, कावळा, बदक यासह कोणत्याही पक्षामार्फत मनुष्यांमध्ये पसरतो. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर पशुपालन विभाग जलाशयांजवळ येणाऱ्या पक्षांवर नजर ठेवली जात आहे.
प्रवासी पक्षांच्या संपर्कात आल्याने व त्यांनी चावा घेतल्यानंतर अन्य पक्षांमध्ये हा व्हायरल पसरतो. बर्ड फ्लूच्या नियंत्रणासाठी अजूनपर्यंत कोणतीच व्हॅक्सीन बनवण्यात आलेली नाही. यामुळे व्हायरस संपवण्यासाठी पक्षांना मारणे हाच पर्याय आहे. यामुळे या व्हायरसच्या पुष्टीसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यातील पक्षांची सीरो सँपलिंग केली जाणार आहे. सीरो सँपलिंगमध्ये पाहिले जाते की, पक्षांच्या शरीरात अँटीबाडी बनत आहेत की नाही.
केरळमध्ये आतापर्यंत ३ हजारांहून अधिक पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. राज्यभरातील जलाशयांमध्ये स्थलांतरित पक्ष्यांवरही पशूसंवर्धन विभाग लक्ष ठेवून आहे. पशुसंवर्धन संचालनालयाने सर्व जिल्ह्यांतील पशुवैद्यकांना पक्ष्यांचा असामान्य मृत्यू झाल्यास त्यांचे नमुने भोपाळ येथील उच्च सुरक्षा पशू रोग प्रयोगशाळेत पाठवले जातील.