Gautam Adani : अदानी ग्रुप पुन्हा गोत्यात! २० अब्ज रुपयांची लाच दिल्याचा आरोप, गुंतवणूकदारांचीही केली फसवणूक
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Gautam Adani : अदानी ग्रुप पुन्हा गोत्यात! २० अब्ज रुपयांची लाच दिल्याचा आरोप, गुंतवणूकदारांचीही केली फसवणूक

Gautam Adani : अदानी ग्रुप पुन्हा गोत्यात! २० अब्ज रुपयांची लाच दिल्याचा आरोप, गुंतवणूकदारांचीही केली फसवणूक

Nov 21, 2024 10:40 AM IST

Serious Alligations On Gautam Adani : गौतम अदानी आणि त्यांच्या साथीदारांवर गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच तपासात अडथळा आणत असल्याचे देखील म्हटले गेले आहे.

Indian billionaire Gautam Adani speaks during an inauguration ceremony after the Adani Group completed the purchase of Haifa Port earlier in January 2023, in Haifa port, Israel January 31, 2023. REUTERS/Amir Cohen
Indian billionaire Gautam Adani speaks during an inauguration ceremony after the Adani Group completed the purchase of Haifa Port earlier in January 2023, in Haifa port, Israel January 31, 2023. REUTERS/Amir Cohen (REUTERS)

Serious Alligations On Gautam Adani : अमेरिकन सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने (एसईसी) अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर अमेरिकन गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आणि सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप केला आहे. अदानी यांचे पुतणे सागर अदानी, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे एक्झिक्युटिव्ह आणि अ‍ॅज्युर पॉवर ग्लोबल लिमिटेडचे एक्झिक्युटिव्ह सिरिल कबानेस यांच्यावरही आरोप ठेवण्यात आले आहेत.

एसईसीने बुधवारी या व्यक्तींवर सिक्युरिटीज आणि वायर फ्रॉड आणि सिक्युरिटीज फ्रॉड करण्याचा कट रचल्याचा आरोप लावला आहे. हे आरोप कोट्यवधी डॉलरच्या योजनेशी संबंधित आहेत. खोटी आणि दिशाभूल करणारी विधाने करून अमेरिकी गुंतवणूकदार आणि जागतिक वित्तीय संस्थांकडून निधी गोळा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. भारत सरकारने अदानी ग्रीन आणि अ‍ॅज्युर पॉवरला दिलेल्या अब्जावधी डॉलरच्या सौर ऊर्जा प्रकल्पांचा फायदा घेण्यासाठी ही लाच देण्याची योजना आखण्यात आल्याचा आरोप एसईसीने केला आहे.

काय म्हटलंय तक्रारीत?

एसईसीच्या तक्रारीत असे म्हटले आहे की, हे लोक फेडरल सिक्युरिटीज कायद्यांच्या फसवणूक विरोधी तरतुदींचे उल्लंघन करत आहेत. एसईसीच्या निवेदनानुसार, या योजनेदरम्यान अदानी ग्रीनने अमेरिकन गुंतवणूकदारांकडून १७५ दशलक्ष डॉलर्स (सुमारे १४५० कोटी रुपये) पेक्षा जास्त रक्कम गोळा केली. न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजमध्ये अ‍ॅज्युर पॉवरचे शेअर्स ट्रेड करत होते.

मोठी बातमी! दिग्गज उद्योगपती गौतम अदानी लवकरच निवृत्त होणार; कोण असेल साम्राज्याचा वारसदार?

न्यूयॉर्कच्या ईस्टर्न डिस्ट्रिक्ट अ‍ॅटर्नी ऑफिसने गौतम अदानी, सागर अदानी, काबानीज आणि अदानी ग्रीन आणि अ‍ॅज्युर पॉवरशी संबंधित इतरांविरोधात फौजदारी आरोप दाखल केले आहेत. फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस अ‍ॅक्टचे (एफसीपीए) उल्लंघन करून लाचेचा कट रचल्याचा आरोप आहे. २०२० ते २०२४ या कालावधीत अदानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भारत सरकारच्या अधिकाऱ्यांना २५० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त लाच दिल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. लाच देण्यामागे सौर ऊर्जा प्रकल्प मिळविण्याचा हेतू होता. यामुळे पुढील २० वर्षांत २ अब्ज डॉलरपेक्षा जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे.

कॉर्पोरेट फ्रॉड आणि भ्रष्टाचाराचे प्रकरण

अदानी आणि त्यांच्या साथीदारांवर गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. तसेच तपासात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचेही आरोप आहे. एफबीआयचे सहाय्यक संचालक जेम्स डेनेही म्हणाले की, प्रतिवादींनी न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आता हे प्रकरण अमेरिकेतील मोठ्या कॉर्पोरेट फ्रॉड आणि भ्रष्टाचाराचे प्रकरण बनले आहे. भारतीय अधिकाऱ्यांना लाच देणे आणि अमेरिकन गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप अदानींवर लावण्यात आला आहे.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर