सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी बिल्किस बानो प्रकरणात ऐतिहासिक निकाल दिला आहे. सुप्रीम कोर्टाने बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना मुक्त करण्याचा गुजरात सरकारचा निर्णय रद्द केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सर्व दोषींना पुन्हा आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात बिल्किस बानोला मोठा दिलासा मिळाल्याचे म्हटले जात आहे. आता सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर पीड़िता बिल्किस बानोची प्रतिक्रिया समोर आली आहे. बिल्किस बानोने म्हटले आहे की, तिच्या चेहऱ्यावर गेल्या दीड वर्षात पहिल्यांदा हसू उमटले आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निकालाचे स्वागत करताना बिल्किस बानोने न्यायालयाला धन्यवाद दिले आहेत. त्यांनी म्हटले की, गेल्या १६ महिन्यात त्या पहिल्यांदाच हसल्या आहेत. नवीन वर्षाच्या सुरूवात माझ्यासाठी आज झाली आहे. जेव्हा कोर्टाचा निकाल ऐकला तेव्हा मी माझ्या मुलांना घट्ट मिठ्ठी मारली. बिल्किस बानो यांनी म्हटले की, १५ ऑगस्ट २०२२ रोजी दोषींना मुक्त करण्याचा निर्णय त्यांच्या काळजावर डोंगराएवढा दगड ठेवल्यासारखा होता. आज सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर हल्के वाटत आहे.
बिल्किस म्हणाल्या की, गुजरात सरकारने त्यांचे आयुष्य बरबाद करणाऱ्यांना मुक्त केले होते. गुजरात सरकारच्या निर्णयाने माझ्या अस्तित्वावरच शंका येत होती. मात्र देशातील लाखो लोकांनी मला समर्थन दण्याचे धाडस दाखवले. सर्वोच्च न्यायालयाने निकालाने माझ्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हास्य फुलले.
बिल्कीस बानो म्हणाल्या की, दोषींची सुटका करण्यात आल्याने मी कोलमडून गेले होते. लाखो लोक माझ्यासाठी एकत्र येईपर्यंत माझं सर्व धैर्य मी गमावलं होतं. देशातील हजारो लोक आणि महिला पुढे आल्या, माझ्या पाठीशी उभे राहिले, माझ्या बाजूने बोलले आणि सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. बिल्कीस बानो यांनी म्हटलं की, मी जो प्रवास केला तो कधीच एकट्याने केला जाऊ शकत नाही. यामध्ये माझे पती आणि माझी मुले माझ्यासोबत आहेत.
संबंधित बातम्या