बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींनी आत्मसमर्पणापासून दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ११ पैकी १० दोषींची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामध्ये वेगवेगळी कारणे देऊन आत्मसमर्पणापासून दिलासा देण्याची मागणी केली होती. सुनावणी वेळी जस्टिस नागरथाना यांनी म्हटले की, याचिकेला रिकॉर्डवर घेतले आहे. यावेळी खंडपीठाने म्हटले की, याचिकेत काही दम नाही. यामुळे या याचिका आम्ही फेटाळून लावत आहे. त्याचबरोबर सर्व दोषींनी २१ जानेवारीपर्यंत पोलिसांसमोर आत्मसमर्पण करावे.
बिल्किस बानो प्रकरणातील ११ पैकी १० दोषींनी सर्वाच्च न्यायलयात याचिका दाखल केली होती. पीडितेवर बलात्कार व तिच्या नातेवाईकांची हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या १० दोषींनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. दोषींनी आत्मसमर्पण करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. या याचिकांवर शुक्रवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली तसेच कोर्टाने सर्व याचिका फेटाळून लावल्या.
संबंधित बातम्या