मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  VIDEO : हनुमानाच्या मूर्तीसमोर महिलेचा बिकीनीत अश्लील डान्स; भाजपच्या कार्यक्रमातील धक्कादायक प्रकार
Ratlam Bikini Show Viral Video
Ratlam Bikini Show Viral Video (HT)

VIDEO : हनुमानाच्या मूर्तीसमोर महिलेचा बिकीनीत अश्लील डान्स; भाजपच्या कार्यक्रमातील धक्कादायक प्रकार

06 March 2023, 16:59 ISTAtik Sikandar Shaikh

Ratlam Bikini Show Viral Video : बिकीनी शोचा कार्यक्रम भाजपच्या एका बड्या नेत्यानं आयोजित केला होता. त्यात महिलांनी हनुमानाच्या मूर्तीसमोर बिकीनी शो केल्याची घटना समोर आली आहे.

Ratlam Bikini Show Viral Video : जूनियर बॅाडी बिल्डिंगच्या एका कार्यक्रमात भगवान हनुमानाच्या मूर्तीसमोर महिलांनी बिकीनीत अश्लील डान्स केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्यप्रदेशातील रतलाम जिल्ह्यात ही घटना घडली असून हा कार्यक्रम मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या स्थानिक आमदारानं आयोजित केला होता. त्यामुळं मंचावर घडलेल्या धक्कादायक प्रकाराबाबत सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली जात आहे. जूनियर बॅाडी बिल्डिंगच्या स्पर्धेत मंचावर भगवान हनुमानाची मूर्ती ठेवण्यात आली होती. स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांनी बिकीनीत भगवान हनुमानाच्या मूर्तीसमोरच अश्लील डान्स केल्याचा व्हिडिओ कॉंग्रेसनं शेयर केला आहे. त्यामुळं आता या घटनेमुळं राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कॉंग्रेस नेते भूपेंद्र गुप्ता अगम यांनी घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर करत म्हटलं आहे की, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या वाढदिवसानिमित्त रतलामच्या महापौरांच्या उपस्थितीत भगवान हनुमान यांच्या मूर्तीचा अपमान करण्यात आला आहे. महिला बिकीनी घालून भगवान हनुमानाच्या मूर्तीसमोर प्रदर्शन कसं काय करू शकतात?, असाही सवाल गुप्ता यांनी केला आहे. त्यामुळं आता भारतीय संस्कृतीचा विकून खाणाऱ्यांवर मुख्यमंत्री काही कारवाई करणार आहे की नाही?, असा सवाल कॉंग्रेसनं केला आहे. रतलाममधील या कार्यक्रमाचं आयोजन भाजपा आमदार चैतन्य कश्यप आणि महापौर प्रल्हाद पटेल यांनी केलं होतं. त्यामुळं आता या प्रकरणामुळं ऐन विधानसभेच्या निवडणुकीआधीच भाजपच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

रतलाममध्ये भाजपनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात भगवान हनुमान यांच्या मूर्तीसमोर बिकीनी शो झाल्यामुळं सोशल मीडियावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. हनुमानाच्या मूर्तीसमोर बिकीनी घातलेल्या तरुणींना नाचवणाऱ्या भाजप नेत्यांनी कपभर पाण्यात बुडायला हवं, असं एका युजर्सने म्हटलं आहे. तर दुसऱ्यानं भाजपवर टीका करताना म्हटलं आहे की, हा निर्लज्जपणाचा कळस आहे, भाजपा देवीदेवतांचा असा अपमान कसा काय करू शकतं?, असा सवाल केला आहे. मध्यप्रदेशातील रतलाममध्ये बॉडी बिल्डिंगची दोनदिवसीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. रविवारी या स्पर्धेचा समारोप झाला आहे. त्यानंतर आज सकाळी कॉंग्रेसकडून घटनास्थळाचा जलाभिषेक करण्यात आला आहे. याशिवाय या प्रकरणाची आता रतलाम पोलिसांनी चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती आहे.