नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावे यासाठी पोलीस दंडुक्यासोबतच इतरही विविध क्लुप्त्या आणि ट्रिक्सचा वापर करत असतात. रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी दिल्ली पोलिस सोशल मीडियावर विविध क्रिएटिव्ह असे व्हिडिओ आणि फोटो, मजेशीर कॅप्शनसह शेअर करत असतात. अशा पोस्टमुळे लोकांचे मनोरंजन तर होतेच शिवाय सर्वसामान्यांपर्यंत नियमांची माहिती पोचते. दिल्लीतील दुचाकी चालकांसाठी हेल्मेट वापरण्याविषयी मोहीम राबवत आहे. हेल्मेट न वापरण्यासाठी बाइकस्वार काय-काय बहाणे सांगतात, याची एक मजेशीर पोस्ट दिल्ली पोलिसांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. बाइकस्वारने केलेली बहाणा हा ऑस्कर पुरस्कारासाठी पाठवला जावा, अशी पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनली आहे.
‘हेल्मेट न घालण्याबद्दल तुम्ही पोलिसांना कोणतं कारण सांगणार? कमेंटमध्ये तुमचं कारण लिहा’ असं आवाहन दिल्ली पोलिसांनी इन्स्टाग्रामवर एक क्रिएटिव्ह पोस्ट शेअर करत लिहिलं होतं. दिल्ली पोलिसांनी शेअर केलेल्या या पोस्टमध्ये ऑस्करचा पुतळा दाखवण्यात आला आहे. त्यावर लिहिले आहे, ‘सर्वोत्कृष्ट कथेचा ऑस्कर... ‘बस यहीं तक जाना था, इसलिए हेल्मेट नहीं लगाया’.
१२ मार्च रोजी शेअर करण्यात आलेल्या या पोस्टला ४३०० हून अधिक लाईक्स मिळाले आहे. या मजेशीर पोस्टवर लोकांकडून असंख्य कमेंट्सही आल्या आहेत.
‘हेल्मेट खरिदने जा रहा हूं…’ अशी कमेंट एका व्यक्तीने या पोस्टखाली केली आहे.
‘सर, हॉस्पिटल जा रहा था, इमर्जन्सी है’ अशी कमेंट आणखी एका व्यक्तिने केली आहे.
‘हेल्मेट ही तो लेने जा रहा हूं सर घर से..’ अशी कमेंट आणखी एका व्यक्तिने केली आहे.
'जानते हो मै किसका बेटा हूं? अशी कमेंट या पोस्टखाली आहे.
‘सर, भूल गया, दिमाग से निकल गया..’ असं कारण एका सोशल मीडियावरील व्यक्तिने केली आहे.
दिल्ली पोलिसांच्या विनोदबुद्धीचे कौतुक केले जात असून नुकत्याच पार पडलेल्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे निमित्त साधून रस्ते वाहतुकीच्या नियमांबद्दल जनजागृती करण्यासाठी योग्य वापर केला असल्याचं बोललं जात आहे.
संबंधित बातम्या