बीजापूर चकमकीत ३१ नक्षलवादी ठार, २८ जणांची ओळख पटली; ८ लाखांचे बक्षीस असलेला हुंगा कर्माही मारला गेला
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  बीजापूर चकमकीत ३१ नक्षलवादी ठार, २८ जणांची ओळख पटली; ८ लाखांचे बक्षीस असलेला हुंगा कर्माही मारला गेला

बीजापूर चकमकीत ३१ नक्षलवादी ठार, २८ जणांची ओळख पटली; ८ लाखांचे बक्षीस असलेला हुंगा कर्माही मारला गेला

Published Feb 14, 2025 03:15 PM IST

छत्तीसगड पोलिसांनी ३१ पैकी २८ माओवाद्यांची ओळख पटवल्याचा दावा केला असून त्यात १७ पुरुष आणि ११ महिलांचा समावेश आहे. या सर्वांवर एकूण १ कोटी १० लाख रुपयांचे बक्षीस होते.

३१ ठार नक्षलवाद्यांपैकी २८ जणांची ओळख पटली
३१ ठार नक्षलवाद्यांपैकी २८ जणांची ओळख पटली (HT_PRINT)

छत्तीसगड पोलिसांनी ३१ पैकी २८ माओवाद्यांची ओळख पटवल्याचा दावा केला असून त्यात १७ पुरुष आणि ११ महिलांचा समावेश आहे. या सर्वांवर एकूण १ कोटी १० लाख रुपयांचे बक्षीस होते. ठार झालेल्या माओवाद्यांमध्ये ६ जानेवारी रोजी झालेल्या आयईडी स्फोटाच्या मास्टर माइंडचाही समावेश आहे. या स्फोटात सुरक्षा दलाचे आठ जवान आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. याशिवाय इतरही अनेक प्राणघातक हल्ले यांच्याकडून करण्यात आले होते.

बस्तर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी सांगितले की, बंदी घालण्यात आलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (माओवादी) पश्चिम बस्तर विभागाचा सचिव हुंगा कर्मा याच्यावर आठ लाख रुपयांचे बक्षीस होते. ६ जानेवारी रोजी सुरक्षा रक्षकांवर झालेल्या हल्ल्याचा तो मास्टरमाईंड होता. २००६ मध्ये मुरकिनार कॅम्पवर झालेल्या हल्ल्यात ११ पोलिस शहीद झाले होते आणि २००७ मध्ये राणीबोडली कॅम्पवर झालेल्या हल्ल्यातही कर्मा जबाबदार होता.

कर्मा उर्फ सोनकू हा माओवाद्यांच्या विभागीय समितीचा सदस्य होता. सुंदरराज यांनी सांगितले की, तो १९९६ मध्ये प्रतिबंधित संघटनेत सामील झाला होता आणि त्याच्यावर विजापूर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये पोलिस पथके आणि छावण्यांवर हल्ले, अपहरण आणि हत्येसह माओवाद्यांशी संबंधित आठ गुन्हे दाखल आहेत. ठार झालेल्या ३१ दहशतवाद्यांपैकी २८ दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. यात १७ पुरुष आणि ११ महिलांचा समावेश असून त्यांच्यावर मिळून १ कोटी १० लाख रुपयांचे बक्षीस आहे.

या २८ जणांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले असून उर्वरित तिघांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती आयजींनी दिली. राज्यात या वर्षी आतापर्यंत ८१ माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून त्यात बस्तर विभागातील ६५ माओवाद्यांचा समावेश आहे. यात विजापूर आणि इतर सहा जिल्ह्यांचाही समावेश आहे. आयजीपी म्हणाले की, सुरक्षा दलांनी या वर्षी बस्तर भागात वेगवेगळ्या चकमकींमध्ये दोन एके-४७ रायफल, ५ सेल्फ लोडिंग रायफल (एसएलआर), २ इन्सास रायफल आणि ३.३०३ रायफलसह ७७ शस्त्रे जप्त केली आहेत.

Shrikant Ashok Londhe

TwittereMail

श्रीकांत लोंढे हिंदुस्तान टाइम्स-मराठी मध्ये चीफ कन्टेन्ट प्रोड्यूसर आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय व गुन्हेविषयक बातम्या कव्हर करतो. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज, ईटीव्ही-भारत मध्ये रिपोर्टिग आणि डेस्कवरील कामाचा अनुभव. विशेष स्टोरीज, क्रीडा, राजकारण, मनोरंजन तसेच बिझनेसच्या बातम्याही कव्हर करतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर