मराठी बातम्या  /  Nation And-world  /  Bihar Women Ahead In Earning More Than Their Husbands Revealed In Survey

‘या’ राज्यातील महिलांची कमाई पतीच्या कमाईपेक्षा अधिक.. जगतात स्वछंदी आयुष्य, सर्वेक्षणातून खुलासा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Shrikant Ashok Londhe • HT Marathi
Feb 13, 2023 01:40 PM IST

नॅशनलफॅमिली हेल्थ सर्वेच्यारिपोर्टनुसारकमाई आणि घराचेबजेट सांभाळण्यापासून बिहारच्या महिला विवाहितजीवनातीलनिर्णयघेण्यातही पुढे आहेत.

पतीहून अधिक कमाई करण्यामध्ये बिहार राज्यातील महिला अन्य राज्यातील महिलांच्या पुढे आहेत. राज्यातील ४५.६ टक्के महिला पतीच्या कमाईहून अधिक पैसे मिळवतात. हा आकडा  झारखंडमध्ये ४० टक्के, ओडिशामध्ये ३३.६ टक्के आणि दिल्लीत३३.३ टक्के आहे. आपले व पतीचे पैसे कसे खर्च करायचे याचा निर्णय घेण्यातही बिहारी महिला आघाडीवर आहेत. घरखर्चासह नातेवाईक व शिक्षणावर हा पैसे किती खर्च करायचा हा निर्णयही ९१.३ टक्के महिला घेतात. मात्र या निर्णयात त्यांच्या पतीचे सहाय्य असते. 

ट्रेंडिंग न्यूज

नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेच्या रिपोर्टनुसार कमाई आणि घराचे बजेट सांभाळण्यापासून बिहारच्या महिला विवाहित जीवनातील निर्णय घेण्यातही पुढे आहेत. बिहारमध्ये आपल्या कमाईतील पैशाचे निर्णय घेण्यामध्ये ९१.३ टक्के तर पतीचे पैसे खर्च करण्याचा निर्णय घेण्यामध्ये ७९.५ टक्के महिला पुढे आहे. मध्य प्रदेशमध्ये ४३.० टक्के महिला कमाईच्या बाबतीत पतीपेक्षा पुढे आहे. त्याचबरोबर ८५ टक्के महिला आपली कमाई आणि ७४.३ टक्के महिला पतीच्या कमाईचा खर्च करण्याचा निर्णय पतीच्या मदतीने घेतात. उत्तर प्रदेशमध्ये ४०.९ टक्के महिला कमाईच्या बाबतीत पुढे आहेत, तर येथील येथील ८५.६ टक्के महिला खर्च करण्याचा निर्णय ङेतात. आसाममध्ये ३९.६ टक्के,  मणिपूरमध्ये ४४, सिक्किममध्ये २६.४, उत्तराखंडमध्ये ३१.५, राजस्थानमध्ये ३७.८,  पंजाबमध्ये  ३९.७ टक्के महिला कमाईत अव्वल आहेत. 

बिहारच्या महिला आपल्या वैवाहिक आयुष्यातही नकार देण्याचे स्वातंत्र्य ठेवतात. रिपोर्टनुसार राज्यातील ८१.७ टक्के महिला अशा आहेत, ज्या वैवाहिक आयुष्यात निर्णय घेतात, पतीला नाही म्हणण्याचे धाडस दाखवतात. पंजाबमध्ये ७३.२, राजस्थानमध्ये ७९.२, अरुणाचल प्रदेशात ६३.३, आसामध्ये ७७.३, आंध्रप्रदेशमध्ये ७९.३, कर्नाटकमध्ये ८१.४, प.बंगालमध्ये ७९.५ टक्के असा आकडा आहे. विशेष म्हणजे ग्रामीण आणि शहरी क्षेत्रातील आकड्यात खूप कमी अंतर नाही. ग्रामीण क्षेत्रात जेथे ८१.४ टक्के महिला निर्णय घेतात तर शहरी भागात हा आकडा ८४.८ टक्के आहे. 

WhatsApp channel

विभाग