Bihar weather update : बिहारमध्ये दिवसेंदिवस वाढत असलेल्या उष्णतेच्या लाटेने (Bihar Temperature) मागील सर्व रेकॉर्ड तोडले आहे. उकाड्याने लोकांचे हाल होत असून हवामान विभागाने बिहारमधील अनेक जिल्ह्यात अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने राज्याच्या दक्षिण पश्चिम, दक्षिण मध्य भागात एक दोन स्थानात भीषण उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने येथे येलो अलर्ट जारी केला आहे. आज लू मुळे नालंदा येथे होमगार्डचा जवान आणि बेगूसराय मध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. बुधवारी भीषण उकाड्याने वेगवेगळ्या शाळांतील शिक्षक आणि मुलांसह ३३७ जण आजारी पडले आहेत. गुरुवारी १६ लोकांचा मृत्यू झाला.
वाढत्या तापमानाच्या (bihar temperature today) पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बिहारच्या दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण-मध्य भागात एक-दोन ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने हवामान खात्याने याठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
बिहारमधील अनेक जिल्ह्यातील तापमानाने उच्चांक नोंदवला आहे. गुरूवारी बिहारमधील बक्सर, भोजपूर, रोहतास, भभुआ, औरंगाबाद आणि अरवल येथे कमाल तापमान ४६ अंश ते ४८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्याचबरोबर दक्षिण मध्य पाटणा, गया, नालंदा, शेखपुरा, नवादा, बेगुसराय, लखीसराय, जहानाबाद येथे कमाल तापमान ४४ ते ४६ अंशांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. दक्षिण बिहारमधील बहुतांश भागात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत पाटणा ४२.८ अंश सेल्सिअस, गया ४६.८ अंश सेल्सिअस, भागलपूर ३९ अंश सेल्सिअस आणि पूर्णिया ३७ अंश सेल्सिअस तापमान होते.
तापमान व हीटवेवच्या कारण विजेची मागणी वाढल्यामुळे वीज पुरवठाही वारंवार खंडित होत आहे. वीज विभागाने लोकांना आवाहन केले आहे की, सर्व उपकरणे एकत्र सुरू ठेऊ नका. पाण्याचे मोटार, इस्त्री, वाशिंग मशीन आणि अन्य लोड सकाळी ५ ते ११ वाजेपर्यंतच सुरू ठेवा.
संबंधित बातम्या