Viral News : बिहारमध्ये १ वर्षांच्या चिमूरड्याचे कौतुक होत आहे. या मुलीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलीने एका मोठ्या सापाला चावून ठार मारल्याचा दावा केला जात आहे. ही घटना गया जिल्ह्यातील आहे. या घटनेने संपूर्ण गाव हादरलं आहे. एवढेच नाही तर मुलीचे कुटुंबीय त्याला घेऊन गेलेल्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही ही घटना ऐकून धक्का बसला आहे. विषारी सापाला चावून मारल्यानंतरीही मुलगा हा ठणठणीत बरा आहे. यामुळं डॉक्टरही आश्चर्य व्यक्त करत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना १७ ऑगस्टला घडली आहे फतेहपूर पोलीस स्टेशन हद्दीतील जमुहर गावात हा मुलगा आपल्या कुटुंबासह राहतो. रियांश असे या एक वर्षाच्या मुलाचे नाव आहे. तो त्याच्या घराच्या टेरेसवर खेळत होता. खेळतांना अचानक त्याच्या जवळ साप आला. त्याने या सापाला त्याने हातात धरून दातांनी चावून मारले. काही वेळाने कुटुंबीय छतावर आले. यावेळी त्यांनी जे पाहिलं ते पाहून त्यांना मोठा धक्का बसला. त्यांना मुलाशेजारी मेलेला साप आढळला. त्यांनी मुलाला तातडीने स्थानिक रुग्णालयात नेले व डॉक्टरांना संपूर्ण घटनेची माहिती दिली.
मुलाच्या आईचा दावा आहे की, मूल गच्चीवर खेळत असताना तिथे एक साप आला. मुलाला साप खेळण्यासारखे वाटले आणि त्याने त्याला पकडले. मुलाने साप तोंडात टाकला आणि त्याला चावू लागला. यात सापाचा मृत्यू झाला. ही घटना पाहून तिला धक्का बसल्याचेही मुलाच्या आईचे म्हणणे आहे. रुग्णालयातील डॉक्टरांनी मुलावर उपचार करून त्याला पूर्णपणे निरोगी घोषित केले. हा साप विषारी नसल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. हा साप साधारणपणे पावसाळ्यात आढळतो असे रुग्णालय प्रशासनाने मुलाच्या कुटुंबीयांना सांगितले. मुलाच्या प्रकृतीची माहिती मिळताच कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.