Viral Video: 'या' शिक्षिकेच्या टीचिंग स्टाइलची देशभर चर्चा; मुलांना कशी शिकवते? पाहा व्हिडिओ-bihar teacher unique teaching style goes viral on social media ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: 'या' शिक्षिकेच्या टीचिंग स्टाइलची देशभर चर्चा; मुलांना कशी शिकवते? पाहा व्हिडिओ

Viral Video: 'या' शिक्षिकेच्या टीचिंग स्टाइलची देशभर चर्चा; मुलांना कशी शिकवते? पाहा व्हिडिओ

Aug 12, 2024 11:37 AM IST

Bihar Teacher Viral Video: बिहार येथे लहान मुलांना आगळ्या- वेगळ्या स्टाइलने शिकवणाऱ्या शिक्षिकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

बिहारच्या शिक्षिकेच्या टीचिंग स्टाइलचा संपूर्ण देश झाला फॅन
बिहारच्या शिक्षिकेच्या टीचिंग स्टाइलचा संपूर्ण देश झाला फॅन

Teacher Unique Teaching Style: शाळेतील सर्व शिक्षकांची शिकवण्याची पद्धत वेगळी असते. लहान मुलांना शिकवणे, हे अनेक शिक्षकांसमोर एखाद्या आव्हानापेक्षा कमी नसते. शिकवलेल्या गोष्टी लहान मुलांच्या डोक्यात कायम राहाव्यात, यासाठी शिक्षक त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एक शिक्षिका मुलांना आगळ्या- वेगळ्या पद्धतीने शब्दांचे ज्ञान देत आहे. या शिक्षिकेचा व्हिडिओ देशभरात व्हायरल झाला असून अनेकांना त्यांची टीचिंग स्टाइल आवडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ बिहारच्या बांका जिल्ह्यातील माध्यमिक शाळेतील आहे. व्हायरल व्हिडिओत दिसत आहे की, संबंधित शिक्षिका ज्या पद्धतीने मुलांना शिकवत आहे, त्यामुळे मुलांना सहज समजते. @Tchr_Khushboo या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, शिकवलेल्या गोष्टी मुलांच्या कायम लक्षात राहिल्या पाहिजेत. यासाठी कधी-कधी त्यांच्यासारखे लहान मुल व्हावे लागते आणि त्यांना शिकवावे लागते. अशा पद्धतीने शिकवण्याचा आनंद मिळतो.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून नेटकरी संबंधित शिक्षिकेचे कौतूक करत आहेत. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचे ओएसडी संजय कुमार यांनीही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर शिक्षिकेचे कौतुक केले आहे. भारत सरकार मुलांना दररोज शाळेत येण्यासाठी जागरुक करत आहे. यासाठी सरकार 'चहक' नावाचा उपक्रम राबवत आहे. या उपक्रमात मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांना अभ्यासक्रम सहज समजावा, यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे, जेणेकरून शिक्षक मुलांना दररोज शाळेत येण्यास प्रवृत्त करू शकतील. संबंधित शिक्षिका देखील या योजनेअंतर्गत मुलांना रोज शाळेत येण्यासाठी प्रवृत्त करत आहेत.

सरकारी शाळेतील महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसोबत धक्कादायक कृत्य

जयपूर येथील सरकारी शाळेतील महिला शिक्षिकेचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला, ज्यात संबंधित शिक्षिका वर्गात मुलीचे केस पकडून तिला क्रूरपणे जमिनीवर आदळताना दिसत आहे. या घटनेत चिमुकलीच्या पायाला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जयपूरच्या बानी पार्क येथील महात्मा गांधी सरकारी शाळेत ही घटना घडली, जिथे लेव्हल-२ ची शिक्षिका बबिता चौधरी या ३ ऑगस्ट रोजी वर्ग घेत होती. त्यानंतर शिक्षकाने संतापून १० वर्षांच्या मुलीचे केस पकडून तिला जमिनीवर फेकले. शाळेच्या मुख्याध्यापकांच्या तक्रारीची दखल घेतली आणि सीसीटीव्ही पाहिल्यानंतर महिला शिक्षिका बबिता चौधरीला निलंबित केले. तसेच संपूर्ण घटनेची चौकशी करण्यात येत आहे.

विभाग