रेल्वेच्या बोगीचा रस्त्यावर अपघात; कंटेनरचे झाले दोन तुकडे, पाहा कसा झाला हा विचित्र अपघात
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  रेल्वेच्या बोगीचा रस्त्यावर अपघात; कंटेनरचे झाले दोन तुकडे, पाहा कसा झाला हा विचित्र अपघात

रेल्वेच्या बोगीचा रस्त्यावर अपघात; कंटेनरचे झाले दोन तुकडे, पाहा कसा झाला हा विचित्र अपघात

Published Jan 01, 2024 02:59 PM IST

Truck carrying train coach Accident : रेल रेस्टॉरंटसाठी रेल्वेची बोगी घेऊन जाणारा कंटेजर भागलपूरमध्ये दुर्घटनाग्रस्त झाला आहे. या अपघातात ट्रकचे दोन तुकडे झाले आहेत.

train bogie load truck accident in Bhagalpur
train bogie load truck accident in Bhagalpur

बिहारमधील भागलपूर शहरात रविवारी सकाळी एक विचित्र अपघात झाला. यामुळे रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. ट्रेनची बोगी ट्रकमध्ये लादून स्टेशनकडे नेली जात होती. रस्त्यावरून  टर्न घेताना ट्रक अनियंत्रित झाला व बोगी ट्रकमधून खाली सरकू लागली. चालकाने अनेक प्रयत्न करूनही ट्रक पुलाचे रेलिंग तोडून पुढे निघून गेला. या अपघातात ट्रकचे दोन तुकडे झाले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

ही बोगी रेल्वे यार्डात ठेवण्यात आली होती. रविवारी सकाळी ट्रकमध्ये लादून ही बोगी रेल्वे जंक्शन परिसरात आणली जात होती. भागलपूरच्या लोहिया पुलावरून खाली उतरताना ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व ट्रक वळण घेत असताना पुलाची रेलिंग तोडून पुढे सरकला. रस्त्याकडेचे दुकानदार व लोक तत्काळ बाजुला झाले. 

रेल रेस्टॉरंटची तयारी केली जात आहे. त्यासाठी ट्रेनची बोगी यार्डमधून स्टेशन परिसरात आणली जात आहे. एका पुलावर कंटेनर अनियंत्रित झाला मात्र चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अपघात टळला आहे. भागलपूर रेल्वेचे सीडीएससह रेल्वेचे अनेक कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

घटनेनंतर रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे टप्प झाली. रेल्वे पदाधिकारी आणि आरपीएफने वाहने दुसऱ्या मार्गांनी वळवली. घटनास्थली पोलिसांनी ब्रेकेडिंग करून लोकांना दुसऱ्या मार्गाने पाठवले. 

ब्रेक फेल झाल्याने अपघात -
स्थानिक लोकांनी सांगितले की, सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास रोलर ट्रेनची बोगी घेऊन स्टेशनकडे जात होता. त्यावेळी कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. सकाळच्या सुमारास हा अपघात झाल्याने रस्त्यावर वर्दळ कमी होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. लोकांनी सांगितले की, समोर अनेक बसेस उभ्या होत्या. चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अपघात टळला. या घटनेत चालक जखमी झाला असून त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर