मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Nitish Kumar : सकाळी राजीनामा आणि सायंकाळी पुन्हा शपथविधी, उद्या नवव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनणार नितीश कुमार?

Nitish Kumar : सकाळी राजीनामा आणि सायंकाळी पुन्हा शपथविधी, उद्या नवव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनणार नितीश कुमार?

Jan 27, 2024 09:24 PM IST

Nitish Kumar News : नितीश कुमारशनिवारी रात्रीपर्यंत कधीही राजनामा देण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्याचबरोबर नितीश कुमार रविवारी सायंकाळी पुन्हा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात.

Nitish Kumar
Nitish Kumar

बिहारच्या राजकारणात झालेल्या प्रचंड मोठ्या उलथापालथीनंतर आता वृत्त आले आहे की,बिहार मुख्यमंत्री नितीश कुमार रविवारी सकाळी आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या सूत्रांनी शनिवारी ही माहिती दिली. त्याचबरोबर नितीश कुमार शनिवारी रात्रीपर्यंत कधीही राजनामा देण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्याचबरोबर नितीश कुमार रविवारी सायंकाळी पुन्हा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार नितीश कुमार रविवारी सकाळपर्यंत राजीनामा देऊ शकतात. त्यापूर्वी ते विधीमंडळ पक्षाची बैठक बोलावू शकतात.भाजपच्या पाठिंब्यावर नवीन सरकारच्या शपथविधी होणार आहेत. त्यामुळे रविवार असूनही सचिवालयाचे कामकाज सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, बिहार भाजप कार्यकारिणीच्या बैठकीनंतर जेडीयूला पाठिंबा देण्याची औपचारिक घोषणा केली नाही.भाजपच्या सूत्रांनी सांगितले की, वरिष्ठ नेत्यांनी आदेश दिले आहेत की, नितीश कुमार यांनी राजीनामा देईपर्यंत त्यांना पाठिंब्याची घोषणा करू नये.

रविवारी सचिवालयाची सुट्टी रद्द –

रविवारी सकाळी १० वाजता जेडीयू विधीमंडळ दलाची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एनडीए विधीमंडळ दलाची बैठक होईल. बैठकीनंतर नितीश राजभवन जाऊन आपल्या पदाचा राजीनामा देतील. तसेच एनडीए आमदारांच्या पाठिंब्याचे पत्रही राज्यपालांना सोपवतील. त्यानंतर सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास पुन्ही मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सांगितले जात आहे की, रविवारी बिहार सचिवालयाची सुट्टी रद्द केली आहे.

बिहारमधील राजकीय हालचाली गतिमान -
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी जेडीयू आमदार जमण्यास सुरूवात झाली आहे. जेडीयू आमदारांची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे. शुक्रवारी सायंकाळी बिहारमधील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी नीतीश कुमार यांनी पक्षातील चार वरिष्ठ नेत्यांना आपल्या निवासस्थानी बोलावले होते. त्यामध्ये लल्लन सिंह यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित होते.

 

टी-२० वर्ल्डकप २०२४