Bihar News: बिहारमधील नालंदा जिल्ह्यात एका विक्षिप्त प्रियकराने प्रेयसीच्या वडिलांची हत्या केली. अष्टवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उगवा गावात ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकरसह ४ जणांना अटक केली असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
जिंतेंद्र रविदास असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, अजय रविदास मुख्य आरोपीचे नाव आहे. डीएसपी नरुल हक यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, प्रेमप्रकरणातून ही हत्या करण्यात आली. जितेंद्रच्या मुलीचे अजयशी प्रेमसंबंध होते. जितेंद्रला याची जाणीव होती. तिने आपल्या मुलीला बॉयफ्रेंड अजयशी बोलण्यास मनाई केली. तसेच मुलीचा मोबाइल फोन फोडून फेकून दिला. याबाबत अजयला कळाल्यानंतर तो संतापला आणि त्याने जितेंद्रचा कायमचा काटा काढण्याचा प्लान बनवला.
अजय आणि जितेंद्र हे दोघेही आमली पदार्थांचे व्यसन करतात. जिंतेद्र नशेत असताना आरोपीने त्याला गावातील शाळेच्या छतावर नेले. तिथे अजयने जितेंद्रवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर गळा आवळून त्याची हत्या केली. या घटनेत सौरभ पासवान, लव कुमार आणि कुश कुमार यांनी अजयची मदत केली. घटनास्थळी सापडलेले रक्ताचे डाग आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी जितेंद्रच्या मुलीच्या प्रियकरासह त्याच्या मित्राला अटक केली.
गाझियाबाद येथे ५५ वर्षीय महिलेची तिच्या मुलाने दोन मित्रांसोबत हत्या केली. या घटनेचा उलगडा करत पोलिसांनी तिन्ही मारेकऱ्यांना अटक केली असून त्यांच्या सांगण्यावरून घटनेत वापरण्यात आलेली वीट आणि दुचाकी जप्त केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेल्या महिलेच्या या मुलाने आईकडे २० हजार रुपयांची मागणी केली. मात्र, त्याच्या आईने पैसे देण्यास नकार दिला. ज्यामुळे आरोपी मुलाने आपल्या आईच्या हत्येचा कट रचला. डीसीपी ग्रामीण सुरेंद्र नाथ तिवारी यांनी सांगितले की, मृत महिला गाझियाबाद येथील ट्रॉनिका सिटी पोलिस स्टेशन परिसरातील मंडोला गावात वास्तव्यास होत्या आणि जीन्स फॅक्टरीमध्ये काम करायच्या. दरम्यान, ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ती नेहमीप्रमाणे कारखान्यात गेल्या. पण घरी परतल्या नाहीत. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी त्याचा मृतदेह गावाजवळ रक्तरंजित अवस्थेत आढळून आला. पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलीस चौकशीत महिलेचा २६ वर्षीय मुलगा सुधीर उर्फ मोहित उर्फ चुल्लक यानेच आईची हत्या केल्याची निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी सुधीरसह त्याच्या दोन मित्रांना अटक केली.