Bihar News: बिहारच्या पाटण्यात आज पहाटे धक्कादायक घटना घडली. एका व्यक्तीने पत्नी आणि मेहुणीवर गोळ्या झाडून स्वत:ही आत्महत्या केली. या घटनेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून मेहुणी गंभीर जखमी झाली आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संबंधित व्यक्तीची पत्नी अनेक दिवसांपासून तिच्या माहेरी राहत होती आणि तिला तिच्या सासरच्या घरी जायचे नव्हते. पती तिला घ्यायला आला असता तिने पुन्हा नकार दिला. यामुळे संतापलेल्या पतीने असे धक्कादायक पाऊल उचलले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दीपक कुमार असे आरोपीचे नाव आहे. दीपकच्या पत्नीचे नाव लक्ष्मी देवी आणि मेहुणीचे नाव गुडिया आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीपक हा मूळचा बिहार शरीफचा रहिवासी होता. सासरी असताना लक्ष्मीचे दिपकसोबत कौटुंबिक कारणावरून वाद झाला. यानंतर लक्ष्मी आपल्या माहेरी बाढ येथे आली. गेल्या दोन महिन्यापासून ती माहेरीच राहत होती.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपकने लक्ष्मीला सासरी येण्याचा आग्रह केला. परंतु, लक्ष्मीने नकार दिला. यामुळे दोघांत वाट पेटला. हा मिटण्याऐवजी इतका पेटला की, दीपकने लक्ष्मीवर गोळ्या झाडल्या. या घटनेत लक्ष्मीचा जागीच मृत्यू झाला. हा आवाज ऐकून लक्ष्मीची बहीण गुडिया तिला वाचवण्यासाठी आली असता दीपकने तिच्यावरही गोळ्या झाडल्या. त्यानंतर दीपकने स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेत गुडिया गंभीर जखमी झाली असून तिच्यावर तिची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पत्नीची हत्या केल्याप्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टाचे न्यायाधीश प्रमोदकुमार गिरी यांनी पती सुनील कुमार याला जन्मठेप आणि ३० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास त्याला एक वर्षाची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे. सरकारी वकील वेदप्रकाश पांडे यांनी न्यायालयाला सांगितले की, कलवारी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दरीडीहा गावात राहणाऱ्या राम सावरे यांनी दुबौलिया पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यांची मुलगी नीलम (२८) हिचा विवाह ७ वर्षांपूर्वी डिसेंबर २०११ मध्ये सुनील कुमार यांचा मुलगा राममिलन गाव सिसौनी पोलिस स्टेशन दुबौलिया याच्याशी झाला होता. तिला चार मुले आहेत. नीलमचे पती आणि सासू हंसरानी दररोज हुंड्याची मागणी करत असत. त्यानंतर आरोपी पतीने १६ डिसेंबर २०१८ रोजी निलमचा गळा आवळून हत्या केली.पोलिसांनी हुंडाबळीसह अन्य कलमान्वये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायाधीशांनी विवाहितेच्या हत्येला हुंडाबळी नव्हे तर हत्या मानले आहे. पती सुनील कुमार याला जन्मठे