Bihar Hooch Tragedy: बिहारच्या मोतिहारीमध्ये मागील दोन दिवसात १४ लोकांचा संशयास्पद पद्धतीने मृत्यू झाला आहे. विषारी दारूच्या सेवनाने या लोकांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पूर्व चंपारण जिल्ह्यातील विविध गावात राहणाऱ्या एक डझनहून अधिक लोकांवर उपचार सुरू आहेत. त्यांच्या डोळ्याची दृष्टी गेली आहे. पाटण्यातून दारूबंदी विभाग वएफएसएलचे पथक मोतिहारीकडे रवाना झाले आहे. पोलिसांनी सात लोकांना ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. दरम्यान स्थानिक प्रशासनाने अजूनपर्यंत विषारी दारूने मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नी. मृतांच्या पोस्टमार्टम अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे.
घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पूर्व चंपारण जिल्ह्यात शनिवारी आणखी ८ लोकांचा मृत्यू झाले. यामध्ये ५ तुकौलिया, २ हरसिद्धि आणि एक व्यक्ती पहाडपूर येथील रहिवासी होता.शुक्रवारीही तुरकौलियामध्ये ४ आणि पहाडपूरमध्ये ४ लोकांची मृत्यू झाला होता. येथे २ दिवसात १४ हून अधिक लोकांनी जीव गमावला आहे. हा आकडा वाढण्याची भीती आहे. मोतिहारी सरकारी रुग्णालयात१० लोकांचा दाखल केले असून यामधील दोघांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना मुजफ्फरपूरला हलवण्यात आले आहे.
रुग्णालयात दाखल सर्व रुग्णांची दृष्टी गेली असून त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल केले आहे. पोलीस मुख्यालयाने तापर्यंत जिल्ह्यात चार मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. मात्र स्थानिक प्रशासनाने याला दुजोरा दिलेला नाही. प्रशासनाचे म्हणणे आहे की, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण समोर येईल. याप्रकरणात सात लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काही लोकांचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
अशीही माहिती मिळत आहे की, अनेक मृतांच्या नातेवाईकांनी पोस्टमार्टम न करताच मृतदेहावर अंतिम संस्कार केले आहेत. दरम्यान ग्रामस्थ आणि कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, दारू प्यायल्याने त्यांची तब्येत बिघडली होती.
छपरा येथेही विषारी दारूने ७७ बळी -
मागील वर्षी डिसेंबर महिन्यात छपरा येथेही दारू कांड झाले होते. सारण जिल्ह्यातील अनेक गावांत विषारी दारू प्यायल्याने ७७ लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर नितीश सरकारवर विरोधकांना हल्लाबोल केला होता. मात्र मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटले होते की, जो दारूचे सेवन करून तो मरेल. त्यांना मृतांच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई देण्यास साफ नकार दिला होता.