Hajipur Bike stunt: काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्रविचित्र स्टंट करून लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. वाहतुकीचे नियम मोडून रस्त्यावर वाहनांची भन्नाट स्टंटबाजी करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. पण, ही स्टंटबाजी अनेकदा अंगलट देखील येते. मात्र, तस्टंटबाजी करणारे हे तरुण स्वत: बरोबरच इतरांचाही जीव धोक्यात घालतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात काही तरुण रस्त्यावर दुचाकी चालवत स्टंटबाजी करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की, चार तरुण भरधाव वेगाने रस्त्यावर दुचाकी चालवत आहेत. यातील एक जण मुद्दाम समोरून येणाऱ्या वाहनांना हुलकावणी देत पुढे जाताना दिसत आहे. असे त्याने दोन- तीन वेळा केले. पण तिन्ही वेळा हा तरुण थोडक्यात बचावला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
@ChapraZila या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिण्यात आले आहे की, कदाचित यमराज झोपले असतील म्हणून त्यांचा जीव वाचला, पण हे हाजीपूर पोलीस पाहत आहेत का? यावरून असे समजत आहे की, हा व्हिडिओ बिहारच्या हाजीपूर येथील आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.
एका युजर्सने म्हटले आहे की, अशा लोकांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दुसऱ्याने पोलिसांच्या कामगिरी प्रश्नचिन्ह उपस्थित करत पोलीस नेहमीच उशीरा येते, असे म्हटले आहे. तिसऱ्याने म्हटले आहे की, अशा लोकांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, ते स्वतःचा आणि इतर लोकांचा जीव धोक्यात घालत आहेत. आणखी एका युजरने म्हटले आहे की, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, इतके चालान कापा की त्यांना दुचाकी विकावी लागेल.
संबंधित बातम्या