मॉर्निंग वॉकला गेले असताना मंत्र्याला दिली रिक्षानं धडक! चार बॉडीगार्ड जखमी
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  मॉर्निंग वॉकला गेले असताना मंत्र्याला दिली रिक्षानं धडक! चार बॉडीगार्ड जखमी

मॉर्निंग वॉकला गेले असताना मंत्र्याला दिली रिक्षानं धडक! चार बॉडीगार्ड जखमी

Jan 01, 2025 11:24 AM IST

Ratnesh Sada News : मॉर्निंग वॉक घेत असताना बिहारचे मंत्री रत्नेश सदा यांना रिक्षाने धडक दिली असून या अपघात ते गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्या सोबत त्यांचे ४ अंगरक्षक देखील जखमी झाले आहेत.

मॉर्निंग वॉक घेत असतांना बिहारचे मंत्री रत्नेश सदा यांना रिक्षाने दिली धडक! चार अंगरक्षकही झाले जखमी
मॉर्निंग वॉक घेत असतांना बिहारचे मंत्री रत्नेश सदा यांना रिक्षाने दिली धडक! चार अंगरक्षकही झाले जखमी

JDU Minister Ratnesh Sada accident news : बिहारमधील सहरसा जिल्ह्यात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी  एक मोठी घटना घडली. बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यात मंत्री रत्नेश सदा हे मॉर्निंग वॉक घेत असताना त्यानं भरधाव रिक्षाने धडक दिली आहे.  या अपघातात रत्नेश सदा हे गंभीर जखमी झाले आहेत.  या घटनेत रत्नेश सदा यांच्यासह त्यांचे चार अंगरक्षक देखील जखमी झाले आहेत. सदा यांना तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी वाहनचालकाला अटक केली आहे.  महिशी पोलीस स्टेशन हद्दीतील बलिया सिमर गावाजवळ पहाटे ५ वाजता ही घटना घडली आहे.

दारूबंदी विभागाचे मंत्री रत्नेश सदा हे नवीन वर्षांनिमित्त त्यांच्या  मूळ गावी गेले होते. सकाळी ते त्यांच्या अंगरक्षकासह मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. दरम्यान, यावेळी  भरधाव वेगाने येणाऱ्या रिक्षाचालकाने त्यांना जोरदार धडक दिली.  या घटनेत मंत्री रत्नेश सदा व  त्यांचे चार अंगरक्षक जखमी झाले. या सर्वांना सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर रत्नेश सदा यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. .

याप्रकरणी सिव्हिल सर्जन म्हणाले की, या  अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिकेसह डॉक्टरांचे पथक घे घटनास्थळी पोहोचले. या अपघातात रत्नेश सदा यांच्या डोक्याला व शरीरावर काही गंभीर जखमा झाल्या होत्या. त्यांच्यावर  प्राथमिक उपचार करण्यात आले. यानंतर त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आले. त्यांच्यावर उपचार करून त्यांना रुग्णालयातून  डिस्चार्ज देण्यात आला. गार्डच्या पायाला व  हाताला जखमा झाल्या आहेत.   

रस्ते अपघाताबाबत मंत्री रत्नेश सदा यांनी पत्रकारांना सांगितले की, त्यांना गंभीर दुखापत झाली नाही. यात ते किरकोळ जखमी झाले आहेत.  नवीन वर्षाच्या आधी  मंगळवारी (३१ डिसेंबर) रात्री तो त्याच्या गावी गेले होते.  

उपचार करणारे डॉक्टर वरुण कुमार यांनी सांगितले की, मंत्री रत्नेश सदा रुग्णालयात आले तेव्हा त्यांचा रक्तदाब वाढला होता. त्यांना  मधुमेह असून त्यांच्या  डोक्याच्या मागच्या बाजूला जखम झाली होती. त्यांचे सिटी स्कॅन करण्यात आले. पायालाही जखम असल्याने त्यांचा  एक्स-रे काढला. सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत. यामुले त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर