चिकनमध्ये मीठ जास्त झाल्याची तक्रार करणं जिवावर बेतलं! पत्नी व मेहुणीने काठी व रॉडचे घाव घालून केली हत्या-bihar crime wife murder husband in family dispute in west champaran woman arrested ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  चिकनमध्ये मीठ जास्त झाल्याची तक्रार करणं जिवावर बेतलं! पत्नी व मेहुणीने काठी व रॉडचे घाव घालून केली हत्या

चिकनमध्ये मीठ जास्त झाल्याची तक्रार करणं जिवावर बेतलं! पत्नी व मेहुणीने काठी व रॉडचे घाव घालून केली हत्या

Sep 23, 2024 12:12 PM IST

चिकनमध्ये मीठ जास्त झाल्याची तक्रार करणं एका पतीच्या जीवावर बेतलं असून पत्नी व मेव्हुणीने त्याला काठी व लोखंडी रॉडने मारहाण करून त्याची हत्या केली.

पत्नीकडून पतीची हत्या
पत्नीकडून पतीची हत्या

बिहारमध्ये एका नवऱ्याला चिकनच्या रश्श्यात मीठ जास्त झाल्याची तक्रार करणं चागलंच महागात पडलं आहे. या छोट्याशा तक्रारीवरून पत्नी व मेहुणीने त्याला बेदम मारहाण करत त्याला ठार केलं आहे. ही घटना पश्चिम चंपारण जिल्ह्यातील चौतरवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोल्हुआ गावात घडली आहे. पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या बहिणीला अटक केली आहे. त्यांनी पोलीस ठाण्यात नेऊन चौकशी केली  जात आहे.  दोघींनी पतीची काठी आणि लोखंडी रॉडने मारहाण करून त्याची हत्या केली आहे.

शमशेर आलम ऊर्फ लालू (३५) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी त्याची पत्नी शहनाज बेगम आणि अल्पवयीन बहिणीला ताब्यात घेतले आहे. त्यांना तीन मुले आहेत. चिकनमध्ये मीठ जास्त असल्याचा आरोप शमशेर आलम यांनी आपल्या कुटुंबीयांकडे केला आहे. त्यानंतर पती-पत्नीमध्ये भांडण झाले. त्यानंतर पत्नीने लोखंडी रॉड उचलून त्याला मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

या प्रकरणी चौतरवा पोलीस ठाण्याचे प्रमुख संजीत कुमार यांनी सांगितले की, कुटुंबात जेवणावरून वाद झाला होता. या मारहाणीत पतीचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिस आरोपी पत्नी आणि तिच्या बहिणीकडून माहिती घेत आहेत.

ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शमशेर आलम हा गुजरातमध्ये राहून कमाई करत होता. काही दिवसांपूर्वी तो घरी परतला आणि शुक्रवारी सायंकाळी त्याला लोकांनी पाहिले. शनिवारी सकाळी त्यांचा मृतदेह घराबाहेर आढळून आला. स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली की, प्रथम बथवारिया पोलिस ठाण्याचे प्रभारी कामेश कुमार घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदन अहवालातून इतर बाबी समोर येतील, असे पोलिसांनी सांगितले.

तरुणाचा मैत्रिणीवर  घरात घुसून  चाकू हल्ला -

दिल्लीतील रघुबीर नगर भागात एका व्यक्तीने घरात घुसून एका महिलेवर चाकूने हल्ला केल्याची घटना शनिवारी घडली. मुलीचा आरडाओरडा ऐकून पीडितेचे आई-वडील तिला वाचवण्यासाठी धावले त्यानंतर आरोपीने तरुणीच्या आई-वडिलांवरही चाकूने वार केले. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. ओरडाओरडा ऐकून शेजारी त्याच्या मदतीला धावले व त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली.

Whats_app_banner
विभाग