पाटण्यात उमाशंकर घाटावर रविवार सकाळी नाव पलटल्याने पाच लोक बुडाले. नावेतून १७ लोक प्रवास करत होते. सर्वजण नालंदाहून मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यासाठी आले होते. अंतिम संस्कार केल्यानंतर स्नान करण्यासाठी गंगा नदीच्या दुसऱ्या बाजुला जात असताना ही दुर्घटना घडली. बुडणाऱ्यांमध्ये एनएचएआयचे माजी विभागीय अधिकारी अवधेश कुमार आणि त्यांचा मुलगा यांचा समावेश आहे. एनडीआरएफचे पथक बुडालेल्या लोकांचा शोध घेत आहे.
बिहारमधील पाटणा जिल्ह्यातील गंगा नदीच्या उमाशंकर घाटावर १७ प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत पाच जण बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एसडीआरएफच्या सह अन्य पथकांनी आपली कारवाई सुरू केली असून १२ लोकांना वाचवले आहे.
पाटण्याचे एसएसपी राजीव मिश्रा यांनी सांगितले की, एकाच कुटूंबातील १७ लोक नावेतून प्रवास करत होते. या दुर्घटनेत अवधेश कुमार (६० वर्ष), त्यांचा मुलगा नीतीश कुमार (३० वर्ष), हरदेव प्रसाद (६५ वर्ष) आणि एका महिलेसह एकूण ५ जण बुडाले आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाढ परिसरातील उमाशंकर घाटात लोक बोटीने नदी ओलांडत असताना हा अपघात झाला.
प्रत्यक्षदर्शी बंटी कुमारी यांनी सांगितले की, सकाळी सव्वानऊच्या सुमारास १७ जणांना घेऊन जाणारी बोट मध्येच उलटल्याने हा अपघात झाला. गंगा नदीच्या मधोमध बोट उलटली अन् नंतर बुडाली. बोटीतील १२ जणांना वाचवण्यात यश आले आहे. काही जण पोहत सुरक्षित स्थळी पोहोचले. पाच जण अद्याप बेपत्ता आहेत, असे कुमारी यांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि एसडीआरएफच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. “... आम्ही लगेचच घटनास्थळी पोहोचलो आणि बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू केले. बेपत्ता झालेल्या पाच जणांचा शोध सुरू आहे,' अशी माहिती बाढ़चे उपविभागीय दंडाधिकारी शुभम कुमार यांनी दिली.
आम्ही एसडीआरएफच्या जवानांनाही सहभागी करून घेत आहोत आणि बेपत्ता व्यक्तींची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहोत.अपघातग्रस्त बोटीतील बेपत्ता व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.
संबंधित बातम्या