New Sim Card Rules : स्मार्टफोन आज आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. फोनशिवाय एक दिवस राहणे ही कल्पनाही करणे अशक्य आहे. त्याचप्रमाणे सिमकार्डशिवाय तुमचा स्मार्ट फोन अपूर्ण आहे. फोनमध्ये सिम टाकल्याशिवाय फोन वापरता येत नाही. मात्र, या सीम वापरा संदर्भात आता मोठी बातमी आली आहे. ही बातमी प्रत्येकसाठी महत्वाची आहे. दूरसंचार विभागाने सीम वापरासंबंधी नवी नियमावली जाहिर केली आहे. जर तुम्ही ९ पेक्षा जास्त सीम तुमच्या नावावर असेल तर तुम्हाला आता आर्थिक दंड भरावा लागणार आहे. जर हे सीम कार्ड चुकीच्या किंवा गैर मार्गाने घेतले तर प्रसंगी तुम्हाला तुरुंगात सुद्धा जावे लागू शकते.
दूरसंचार कायदा २०२३ २६ जूनपासून देशभरात लागू झाला आहे. DOT नियमांनुसार, एखादी व्यक्ती त्याच्या आधारवरून फक्त ९ सिम खरेदी करू शकते. ९ पेक्षा जास्त सिमकार्ड बाळगल्यास, सुरवातीला ५० हजार रुपये दंड तर याचे वारंवार उल्लंघन केल्यास २ लाख रुपये दंड आकारला जाणार आहे. चुकीच्या पद्धतीने सिम मिळवल्यास ५० लाखांचा दंड आणि तीन वर्षांचा तुरुंगवास तसेच चुकीच्या मार्गाने सिमकार्ड मिळवल्यास ५० लाख रुपयांपर्यंत दंड आणि तीन वर्षांचा कारावासची तरतूद करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, तुमच्या आधारशी किती सिम लिंक आहेत हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही सिम वापरत नसल्यास तुम्ही ते डिस्कनेक्ट देखील करू शकता.
तुमच्या आधार कार्डशी किती सिम लिंक आहेत हे तुम्ही कसे तपासू शकता आणि तुम्ही वापरत नसलेले नंबर कसे बंद करू शकता याची माहिती तुम्हाला सांगणार आहोत. तुमच्या नावावर किती सीम आहेत आणि ते कसे बंद करायचे हे तुम्ही तुम्ही डॉटच्या नवीन वेबसाइटद्वारे काही सेकंदात करू शकता. DOT ने अलीकडेच संचारसाथी नावाचे पोर्टल लाँच केले आहे. या पोर्टलवर नागरिकांना त्यांच्या आधार क्रमांकाशी जोडलेले सर्व फोन नंबरची माहिती मिळू शकते.
१) तुमच्या नावावर किती सीम आहे हे तपासण्यासाठी, तुम्हाला सरकारने सुरू केलेल्या Sancharsathi.gov.in या पोर्टलवर जावे लागेल.
२) आता तुम्हाला मोबाईल कनेक्शन पर्यायावर टॅप किंवा क्लिक करावे लागेल.
३) आता तुमचा संपर्क क्रमांक टाका.
४ ) यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP मिळेल.
५) त्यानंतर, तुमच्या आधार क्रमांकाशी लिंक केलेले सर्व क्रमांक वेबसाइटवर दिसतील.
६) येथून तुम्ही वापरत नसलेले किंवा यापुढे गरज नसलेले हे नंबर तुम्ही तक्रार करू शकता आणि ब्लॉक करू शकता.
संबंधित बातम्या