AAP in Gujarat Election देशाची राजधानी असलेल्या दिल्ली महापालिका निवडणुकीत प्रचंड विजय मिळवणाऱ्या आम आदमी पक्षाला गुजरात व हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. गुजरातमध्ये सत्तांतराचा दावा करणाऱ्या 'आप'ला दोन आकडी जागा मिळालेल्या नाहीत. असं असलं तरी 'आप'नं एक वेगळा विक्रम केला आहे. गुजरातमधील मतटक्क्याच्या जोरावर 'आप'चा राष्ट्रीय पक्ष बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. त्यातील आतापर्यंतच्या मतमोजणीनुसार आम आदमी पक्षानं जवळपास १३ टक्के मतं मिळवली आहेत. त्यामुळं गुजरातमध्ये 'आप'ला प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळणार आहे. तसंच, याच मतांच्या जोरावर हा पक्ष राष्ट्रीय बनणार आहे. अर्थात, निवडणूक आयोगाकडून अंतिम मतटक्क्यांचा आढावा घेऊन याबाबत घोषणा केली जाणार आहे.
देशात किती राष्ट्रीय पक्ष?
निवडणूक आयोगाच्या नोंदीनुसार देशात सध्या काँग्रेस, भाजप, बसप, तृणमूल काँग्रेस, एनसीपी, सीपीआय, सीपीआयएम आणि एनपीपी हे राष्ट्रीय पक्ष आहेत. एनपीपीला २०१९ मध्ये राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. दिल्ली, पंजाब आणि गोव्यात 'आप'नं आधीच प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळवला आहे. गोव्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत 'आप'ला ६.८ टक्के मतं मिळाली होती.
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळविण्यासाठी कोणत्याही पक्षाला खालील अटींची पूर्तता करावी लागते
Himachal Election Results: हिमाचलमध्ये निकालाआधीच फोडाफोडीची भीती, काँग्रेसचे 'ओल्ड गार्ड' सावध