स्कूटरवरून फटाके घेऊन जाताना भीषण स्फोट, गाडीच्या चिंधड्या उडाल्या! एकाचा मृत्यू, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  स्कूटरवरून फटाके घेऊन जाताना भीषण स्फोट, गाडीच्या चिंधड्या उडाल्या! एकाचा मृत्यू, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

स्कूटरवरून फटाके घेऊन जाताना भीषण स्फोट, गाडीच्या चिंधड्या उडाल्या! एकाचा मृत्यू, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

Updated Oct 31, 2024 07:50 PM IST

Firecrackers Explosion : स्कूटीचा टायर रस्त्यावरील खड्ड्यात गेल्याने चालकाचा तोल गेला आणि फटाक्यांची पिशवी खाली पडली. फटाक्यांची पिशवी पडताच मोठा स्फोट झाला. यात एकाचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत.

स्कूटरवरुन फटाके घेऊन जाताना भीषण स्फोट
स्कूटरवरुन फटाके घेऊन जाताना भीषण स्फोट

फटाक्यांच्या कारखान्यात स्फोटच्या बातम्या अधून मधून येत असतात मात्र फटाके घेऊन जातानाही स्फोट झाल्याची घटना समोर आल्यानेदिवाळीत फटाके फोडणाऱ्यांचा काळजाचा ठोका चुकला आहे. दिवाळीत सुरक्षित फटाके फोडण्याचे आवाहन केले जाते. अनेकदचा फटाक्यांमुळे आनंदाचे रुपांतर क्षणात दु:खात झाल्याच्या घटना घडल्या आहेत.आंध्र प्रदेशातील एलुरुमध्ये देखील एक अशीच घटना समोर आली आहे. पिशवीत भरून फटाके घेऊन जात असताना त्याचा झालेल्या स्फोटात एकाला जीव गमवावा लागला आहे. तर ६ जण जखमी झाले आहेत. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

या दुर्घटनेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला आहे तरसहा जण जखमी झाले आहेत. हा स्फोट इतका भीषण होता यामध्ये एका स्कूटीचे तुकडे-तुकडे झाले आहेत. त्यामुळे या स्फोटात मृत्यू झालेल्या आणि जखमींची अवस्था फारच वाईट आहे. यास्फोटाच्या तडाख्यात रस्त्यावर उभे असलेल्या काही लोकांनाही बसला आहे.

एलुरु शहरातील एका निवासी भागातही घटना घडली.ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्येही कैद झालीआहे. व्हिडिओमध्ये दिसते की,हा स्फोट दिवाळीच्या फटाक्यांमुळे झाला आहे. स्कूटरवर बसलेल्या तरुणाच्या हातात फटाक्यांची पिशवी होती. रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांजवळून स्कूटर जात असतानाच स्फोट झाला.रस्त्यावर काही लोक उभे राहून गप्पा मारत आहेत. त्यांच्या जवळून अनेक वाहने जातात. मात्र एक स्कूटर जात असताना फटाक्यांच्या पिशवीत अचानक स्फोट झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत स्कूटरवर बसलेल्या तरुणाचा मृत्यू झाला असून ही घटना आधी स्पष्ट होत नव्हती. परंतू सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर दिवाळीचे फटाके फुटल्याने हा स्फोट झाल्याचे समोर आलं आहे. याबाबत पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांजवळून एक स्कूटी जात असताना हा स्फोट झाल्याने लोकांची धावपळ उडाली. दोन तरुण स्कूटीवर फटाक्यांची पिशवी घेऊन रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांजवळून जात होते. दरम्यान, स्कूटीचा टायर रस्त्यावरील खड्ड्यात गेल्याने चालकाचा तोल गेला आणि फटाक्यांची पिशवी खाली पडली. फटाक्यांची पिशवी पडताच मोठा स्फोट झाला. यामध्ये स्कूटीवर असणाऱ्या दोघांसह शेजारी उभ्या असलेल्या लोकांनाही स्फोटाचा फटका बसला. या भीषण अपघातात स्कूटीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले.

स्फोटानंतर स्थानिक नागरिक जखमींच्या मदतीसाठी तात्काळ धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. यासोबतच जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुधाकर असे मृताचे नाव आहे.

दरम्यान, स्फोटाची तीव्रता इतकी होती कीगाडीचे तुकडे रस्त्यावर उडून पडताना दिसत आहेत. स्फोटानंतर परिसराच गडद राखाडी धूर पसरला होता. त्या धुरातून दोन माणसे स्फोटातून कसेबसे स्वत:चा जीव वाचवून पळताना दिसत आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर