मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Delhi Flood : यमुनेच्या महापुरासाठी भाजप जबाबदार.. दिल्ली जाणूनबुजून बुडवली; ‘आप’चा गंभीर आरोप

Delhi Flood : यमुनेच्या महापुरासाठी भाजप जबाबदार.. दिल्ली जाणूनबुजून बुडवली; ‘आप’चा गंभीर आरोप

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jul 15, 2023 08:22 PM IST

delhiflood news : 'आप'नेशनिवारीभाजपवरगंभीर आरोपकरत दावा केला की,भाजप हरियाणामध्ये असलेल्या आपल्या पक्षाच्या सरकारचा आधार घेऊन महापूर पीडित दिल्लीला आणखी बुडवण्यासाठीहथिनीकुंड धरणातून पाणी सोडत आहे.

Big conspiracy behind delhi floods
Big conspiracy behind delhi floods

राजधानी दिल्लीतील महापुरामागे कोणते षडयंत्र आहे? हरियाणातील हथिनीकुंड धरणातून जाणून बुजून पाणी सोडल्यामुळेदिल्ली बुडाली? दिल्लीत महापुराने हाहाकार माजवला असताना दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टी (AAP) ने भारतीय जनता पार्टी (BJP) वर गंभीर आरोप केला आहे. 'आप'ने शनिवारी भाजपवर गंभीर आरोप करत दावा केला की, भाजप हरियाणामध्ये असलेल्या आपल्या पक्षाच्या सरकारचा आधार घेऊन महापूर पीडित दिल्लीला आणखी बुडवण्यासाठी हथिनीकुंड धरणातून पाणी सोडत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

दिल्ली सरकारमधील मंत्री सौरभ भारद्वाज यांनी शनिवारीएका प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये म्हटले की, १९७८ मध्ये याहून मोठा महापूर आला होता. मात्र आता दिल्लीत पाऊस थांबला असतानाही दिल्लीमध्ये यमुनेची पाणीपातळी १९७८ पेक्षा अधिक कशी झाली आहे. त्यांनी म्हटले की, ६ दिवसांपासून दिल्लीत पाऊस पडलेला नसून शहरात पुराचे पाणी कसे घुसले आहे, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

सौरभ भारद्वाज म्हणाले की, हथिनीकुंडचे जास्तीचे पाणी फक्त दिल्लीला पाठवले गेले व दिल्ली जाणूनबुजून बुडवली गेली, त्यांनी दावा केला की, हथिनीकुंडमधून पश्चिम कालव्यासाठी पाणी न सोडता फक्त दिल्लीसाठी पाणी सोडण्यात आले. यावरून राजकारण केलं जात आहे. सर्वोच्च न्यायालयासह दिल्लीतील सर्व महत्त्वाच्या इमारती बुडवण्याचा भाजपचा कट होता, असा गंभीर आरोपही भारद्वाज यांनी केला आहे.

 

आपचेखासदार संजय सिंह म्हणाले, महापुरामुळे हिमाचल, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि यूपी पूर्णपणे प्रभावित झालेअसून मोदी परदेश दौऱ्यावर गेले आहेत. दिल्लीत तीन दिवसांपासून पाऊस नाही, मग पुराचं कारण काय? याचे कारण भाजपा आणि केंद्राचा दिल्लीप्रती असलेला द्वेष, दिल्ली नष्ट करण्याचे षडयंत्र, मोदीजींचा दिल्लीबद्दलचा द्वेष असल्याचं सिंह म्हणाले.

WhatsApp channel