बनारस हिंदू विद्यापीठात (Banaras Hindu University) गट अ आणि गट बच्या विविध पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. आता अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आता ५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. इच्छुक उमेदवार bhu.ac.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज डाऊनलोड करू शकतात. अर्जाची हार्ड कॉपी १० फेब्रुवारीपर्यंत सादर करणे आवश्यक आहे.
जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ फेब्रुवारी २०२४ आहे. डाऊनलोड केलेल्या अर्जाची हार्ड कॉपी निबंधक कार्यालय, भरती व मूल्यमापन कक्ष, होळकर हाऊस, बीएचयू, वाराणसी -२२१००५ (उत्तर प्रदेश) या पत्त्यावर १० फेब्रुवारी २०२४ पर्यंत पाठविणे आवश्यक आहे. यापूर्वी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २२ जानेवारी होती.
BHU Recruitment 2024 Vacancy Details:
एक्झिक्युटिव्ह इंजिनियर (Executive Engineer) : एकूण जागा - ३
सिस्टिम इंजिनियर - (System Engineer): एकूण पदे -१
ज्युनियर मेंटेनन्स इंजिनियर (Junior Maintenance Engineer /Networking Engineer) : एकूण पद-१
डेप्युटी लायब्रेरियन (Deputy Librarian): एकूण पदे २
असिस्टंट लायब्रेरियन (Assistant Librarian): एकूण पदे -४
चीफ नर्सिंग ऑफिसर (Chief Nursing Officer): एकूण पदे- १
नर्सिंग सुपरिटेंडंट (Nursing Superintendent): एकूण पदे - २
मेडिकल ऑफिसर (Medical Officer): एकूण पदे- २३
नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer): एकूण पदे-२२१
UR (Unreserved category), EWS (Economically Weaker Section) आणि OBC (Other Backward Classes) प्रवर्गातील उमेदवारांना गट ‘अ’ पदांसाठी १००० रुपये आणि गट ‘ब’ शिक्षकेतर पदांसाठी ५०० रुपये ऑनलाइन (नॉन रिफंडेबल) अर्ज शुल्क भरावे लागेल. एससी, एसटी, दिव्यांग आणि महिला प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.