Hathras Stampede Bhole Baba : स्वयंघोषित धर्मगुरू नारायण साकार उर्फ भोले बाबा उर्फ सूरज पाल सिंह जाटव यांच्या हाथरस येथील सत्संग कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ भाविकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महिला व लहान मुलांचा समावेश आहे. या दुर्घटनेनंतर देशभरातून सत्संह आयोजक आणि भोले बाबांविरोधात संतापाची लाट उसळली. पोलिसांनी भोले बाबावर गुन्हा दाखल न केल्याने पोलिसांवरही टीका झाली. असे असताना नारायण साकार यांनी पहिल्यांदाच यावर मौन सोडले आहे.
त्यांनी असंवेदनशील वक्तव्य करत म्हटले की, या दुर्घटनेपासून मी खूप चिंतेत आहे. परंतु, जे घडणार आहे, ते कसं टाळता येईल. ज्याने या जगात, या भूमीवर जन्म घेतलाय त्याला एक दिवस जायचंच आहे. भले त्याच्या मागे कोणी असो अथवा नसो. प्रत्येकाला परत फिरायचं आहे.”
हाथरस येथे २ जुलै रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाल्यानंतर स्वयंघोषित धर्मप्रचारक सूरज पाल ऊर्फ 'भोले बाबा' बुधवारी प्रथमच सार्वजनिक ठिकाणी दिसला. २ जुलैच्या घटनेनंतर मी खूप दु:खी आहे, पण जे घडणार आहे ते कोण रोखू शकेल? जो कोणी आला आहे, त्याला एक ना एक दिवस जायलाच हवं," असं या धर्मगुरूनं एएनआयला सांगितलं.
एफआयआरमध्ये नाव नसलेले पाल म्हणाले, "आमचे वकील डॉ. एपी सिंह आणि प्रत्यक्षदर्शींनी आम्हाला माध्यमातील बातम्याबाबत सांगितले. त्यात काही तरी षडयंत्र आहे हे खरे आहे. आम्हाला एसआयटी आणि न्यायिक आयोगावर विश्वास आहे आणि सत्य बाहेर येईल. सध्या मी माझ्या जन्मगावी बहादूर नगर, कासगंज येथे आहे.
भोळे बाबांच्या वकिलांनी दावा केला होता की, काही अज्ञात व्यक्तींनी फवारलेल्या विषारी पदार्थामुळे चेंगराचेंगरी झाली. प्रत्यक्षदर्शींनी माझ्याशी संपर्क साधला आणि सांगितले की गर्दीत उघडलेल्या विषारी पदार्थाचे डबे घेऊन १५-१६ लोक होते. मी मृतांचे शवविच्छेदन अहवाल पाहिले असून त्यात त्यांचा मृत्यू जखमांमुळे नव्हे तर गुदमरून झाल्याचे दिसून आले आहे, असा आरोप धर्मोपदेशकाचे वकील एपी सिंह यांनी केला होता.
या चेंगराचेंगरीप्रकरणी २ जुलैच्या सत्संगाचे मुख्य आयोजक देवप्रकाश मधुकर यांच्यासह ११ जणांना अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) चेंगराचेंगरीसाठी सत्संग आयोजकांना दोषी ठरवले होते. या निष्कर्षांच्या आधारे सरकारने स्थानिक उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम), एक मंडळ अधिकारी आणि इतर चौघांना निलंबित केले.
एसआयटीच्या म्हणण्यानुसार, सत्संग आयोजकांनी गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी योग्य व्यवस्था केली नाही. त्यांनी वस्तुस्थिती लपवून परवानगी घेतल्याचा आरोप आहे.
विमानात एअर होस्टेसची 'ऑफर' नाकारणाऱ्या प्रवाशाला अटक; कारण ऐकून व्हाल थक्क!
एसडीएमयांनी कार्यक्रमस्थळाची पाहणी न करतासत्संगाला परवानगी दिली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही माहिती दिली नाही, असा आरोपही चौकशी अहवालात करण्यात आला आहे. आयोजन समितीने पोलिसांशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ब्रिजेश कुमार श्रीवास्तव आणि निवृत्त आयपीएस हेमंत राव यांच्या अध्यक्षतेखालील स्वतंत्र न्यायिक आयोगहाथरस चेंगराचेंगरी प्रकरणाचा तपास करत आहे.
संबंधित बातम्या