मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Bharat Ratna : मरणोत्तर ‘भारत रत्न’ मिळणाऱ्या कुटूंबांना कोणत्या सुविधा मिळतात? जाणून घ्या पुरस्काराबद्दल संपूर्ण माहिती

Bharat Ratna : मरणोत्तर ‘भारत रत्न’ मिळणाऱ्या कुटूंबांना कोणत्या सुविधा मिळतात? जाणून घ्या पुरस्काराबद्दल संपूर्ण माहिती

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 09, 2024 07:31 PM IST

Bharat Ratna Benefits : भारत रत्न देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. हा पुरस्कार प्राप्त व्यक्तीला व त्यांच्या कुटूंबाला अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात.

Bharat Ratna
Bharat Ratna

केंद्र सरकारने आज (०९ फेब्रुवारी २०२४) रोजी देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, माजी पंतप्रधान नरसिम्हा राव तसेच महान कृषि शास्त्रज्ञ डॉ. एमएस स्वामीनाथन यांना  देशाचा सर्वोच्च  नागरी सन्मान भारत रत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट 'एक्स' वरून याची माहिती दिली. त्याचबरोबर या तीन महान लोकांच्या देशाला दिलेल्या योगदानाची माहिती दिली. 

भारत रत्न कोणाला दिला जातो?
भारत रत्न देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. हा पुरस्कार राष्ट्रीय सेवा जसे कला, साहित्य, विज्ञान,  सार्वजनिक सेवा तसेच क्रीडा आदि क्षेत्रात दिला जोता. आपल्या क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देत देशाचा गौरव वाढवणाऱ्या व्यक्तीला भारत रत्न पुरस्काराने सन्मानित केले जाते. २०११ पूर्वी केवळ कला, साहित्य, विज्ञान आणि समाज सेवा क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानाबद्दल भारत रत्न दिला जात होता. मात्र २०११ मध्ये या नियमात दुरुस्ती करत भारत रत्न पुरस्कारासाठी कोणतेच असे विशिष्ट क्षेत्र निश्चित केले नाही. भारत रत्न कोणत्याही क्षत्रातील व्यक्तीला दिले जाऊ शकते. एका वर्षी तीन जणांनाच पुरस्कार दिला जातो. मात्र यंदा पाच जणांना पुरस्कार दिला गेला आहे.

भारत रत्न मिळाल्यानंतर काय-काय सुविधा मिळतात?
अन्य पुरस्कारांप्रमाणे भारत रत्न अवॉर्ड मिळवणाऱ्या व्यक्तीला कोणतीही रक्कम दिली जात नाही. हा पुरस्कार दिल्यानंतर अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. भारत रत्न पुरस्काराने सन्मानित व्यक्ती जर एखाद्या राज्यात गेल्यास तेथील सरकार त्यांचे स्वागत राज्यातील विशेष पाहुण्यांच्या रुपात केले जाते. त्यांच्या राहण्याची व्यवस्था, परिवहन, बोर्डिंग आदि सुविधा मोफत पुरवल्या जातात. त्यांना सुरक्षाही पुरवली जाते. भारत रत्न मिळवणाऱ्या व्यक्तीला महत्वाच्या सरकारी कार्यक्रमाला विशेष निमंत्रित केले जाते. भारत रत्न प्राप्त लोकांना सरकार वॉरंट ऑफ प्रेसिडेंसमध्ये स्थान दिले जाते. याचा वापर सरकारी कार्यक्रमात प्राधान्य देण्यासाठी होतो. 

दरम्यान, भारतीय संविधानाच्या कलम १८(१) नुसार, पुरस्कार प्राप्त व्यक्ती आपला बायोडाटा, व्हिजिटिंग कार्ड, लेटर हेड आदिवर आपल्या नावाच्या पुढे भारतरत्न जोडी शकते. 

मरणोत्तर पुरस्कार मिळाल्यानंतर कुटूंबासाठी काय आहे नियम?
जर एखाद्याला मरणोत्तर भारत रत्न मिळाला तर त्याच्या नावासमोर भारतरत्न जोडले जाते. त्यांच्या कुटूंबातील सदस्य जसे पती किंवा पत्नी आणि मुलांनाही राज्य सरकारच्या विशेष अतिथीचा दर्जा दिला जातो. त्यांना वैयक्तिक स्टाफ व चालकही दिले जातात. दरम्यान कुटूंबाना काय सुविधा देण्यात याव्यात याबाबत लिखित कोणतेही नियम नाहीत.

पहिल्यादा कधी व कोणाला दिला भारत रत्न?
भारत रत्न पुरस्काराची सुरूवात १९५४ मध्ये झाली. २ जानेवारी १९५४ रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी याची सुरुवात केली होती. सर्वात आधी स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी, माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि शास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर वेंकट रमन यांना १९५४ मध्ये पुरस्कृत केले गेले. 

भारत रत्न पुरस्कारात काय-काय असते?
भारत रत्न  पुरस्कारात एक पदक आणि प्रशस्ती पत्र (Praise Letter) दिले जाते. भारत रत्न  पुरस्काराने सन्मानित व्यक्तीला भारताच्या राष्ट्रपतींची स्वाक्षरी असलेले सर्टिफिकेट आणि एक प्राचीन पदक  दिले जाते. हे पदक पिंपळाच्या पानाच्या आकाराचे जवळपास ५.८ सेमी लांब आणि ४.७  सेमी  रुंद आणि ३.१ मिमी जाड असते. हे तांब्याच्या धातूपासून बनवलेले असते. यावर चमकणाऱ्या सूर्याची कलाकृती असते. याच्या खाली हिंदी भाषेत 'भारत रत्न' लिहिलेले असते.

WhatsApp channel

विभाग