मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Bharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या सुरक्षेतील पोलीस अचानक गायब! भारत जोडो यात्रा तात्पुरती स्थगित

Bharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या सुरक्षेतील पोलीस अचानक गायब! भारत जोडो यात्रा तात्पुरती स्थगित

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 27, 2023 05:46 PM IST

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra in Kashmir : काँग्रेसची भारत जोडो यात्रा काश्मीरमध्ये सुरू असताना आज अचानक राहुल गांधी यांची सुरक्षा काढून घेण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. यानंतर काँग्रेसनं आजच्या पुरता यात्रा स्थगित केली आहे.

Rahul Gandhi
Rahul Gandhi

Bharat Jodo Yatra latest News : कन्याकुमारीपासून सुमारे दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेली काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा शेवटच्या टप्प्यात आहे. ही यात्रा काश्मीरमध्ये पोहोचली असून याच राज्यात यात्रेचा समारोप होणार आहे. मात्र, काश्मीरमध्ये यात्रा सुरू असताना अचानक राहुल गांधी यांची सुरक्षा काढून घेण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं भारत जोडो यात्रा तात्पुरती स्थगित केली आहे.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा आज बनिहाल येथून जाणार होती. मात्र, बनिहाल इथं सुरक्षा पुरवण्यास पोलिसांनी चक्क नकार दिला. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव राहुल यांनी आजची पुढील पदयात्रा स्थगित केली. उद्या पुन्हा नेहमीप्रमाणे पदयात्रा सुरू होणार आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वत: आजच्या घडामोडींबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, पदयात्रा सुरू होताच मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी झाली. पोलीस सुरक्षा पूर्णपणे हतबल झाली. गर्दीवर नियंत्रण ठेवणारे पोलीस अचानक आजूबाजूला दिसेनासे झाले. त्यानंतर माझ्या खासगी सुरक्षा रक्षकांनी पोलिसांच्या सुरक्षेशिवाय पुढं जाऊ नये, असा सल्ला दिला. त्यामुळं आम्ही यात्रा पुढं सुरू ठेवू शकलो नाही. सुरक्षेची हमी देणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे. ती का पार पाडली गेली नाही मला कल्पना नाही. मात्र, उद्या आणि परवा असं होऊ नये, अशी अपेक्षा राहुल गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी जम्मू-काश्मीरमधील पोलीस प्रशासनाच्या या भूमिकेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. ‘हे ठिकाणी अत्यंत संवेदनशील आहे. जम्मू-काश्मीर पोलीस राहुल गांधी यांच्या जिवाशी खेळत आहेत. त्यांना हे आदेश कुणी दिले?,’ असा सवाल संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला.

IPL_Entry_Point