काँग्रेसची भारत जोड़ो न्याय यात्रा सद्या आसाम राज्यातून जात आहे. यात्रेदरम्यान राहुल गांधी आपल्या बसमधून प्रवास करताना काही लोक अचानक मोदी-मोदी नारे देऊ लागले. ही घोषणाबाजी ऐकून काँग्रेस नेते राहुल गांधी नाराज न होता त्या समर्थकांना फ्लाइंग किस देऊ लागले. राहुल यांची रिएक्शन चर्चेचा विषय बनली आहे.
ही पहिलीच वेळ नाही जेव्हा राहुल गांधी यांनी अशी कृती केली आहे. त्यांनी यापूर्वीच म्हटले आहे की, ते द्वेषाचा सामना प्रेमाने करणार आहेत. त्याचमुळे भारत जोडो न्याय यात्रा दरम्यान फ्लाइंग किस दिला आहे. या वादाबाबत राहुल गांधी यांनी म्हटले की, २० ते २५ भाजप कार्यकर्ते काठी घेऊन आले होते. ते बसच्या खाली उतरताच तेथून पळून गेले.
भारत जोडो न्याय यात्रेवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे. आसामच्या सुनितपूरमधून जात असताना काही लोक हातात भाजप आणि श्रीराम लिहिलेले भगवे झेंडे घेऊन भारत जोडो यात्रेत शिरले. यावेळी त्यांनी गाड्या अडवल्या आणि घोषणाबाजी केली. राहुल गांधी बसमधून हा सर्व प्रकार पाहत होते. दरम्यान, या लोकांनी राहुल गांधींना पाहताच घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर राहुल गांधी आपल्या बसमधून खाली उतरले हे पाहून घोषणा देणारे तेथून पळून गेले.
काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सध्या आसाम राज्यातून जात आहे. न्याय यात्रा सतत चर्चेत राहिली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसची ही न्याय यात्रा म्हत्वाची आहे. न्याय यात्रा ११० जिल्ह्यातून जात आहे, त्याच्या माध्यमातून लोकसभेच्या १०० व विधानसभांच्या ३३७ जागांवर विजय मिळवण्याच्या उद्देश्याने आहे. काँग्रेसची यात्रा मणिपूर, नागालँड, आसाम, बिहार, झारखंड, ओडिशा, उत्तरप्रदेश व गुजरात राज्यातून जाणार आहे.