White Alligator Photo: फ्लोरिडामधील गेटोरलँड ऑर्लॅंडो प्रसिद्ध पार्कमध्ये एका दुर्मिळ मगरीचा जन्म झाला आहे.ज्यामुळे पार्कमधील अधिकाऱ्यांसह कर्मचारीही आश्चर्यचकीत झाले आहेत. ही मगर पांढऱ्या रंगाची असून तिचे डोळे निळ्या रंगाचे आहेत, असे सांगितले जात आहे. दरम्यान, ३६ वर्षांपूर्वी लुईझियानामध्ये या मगरीचे घरटे सापडले होते. अशा मगरीच्या पिल्लांच्या जन्माची ही पहिलीच घटना आहे. हे जगातील दुर्मिळ आणि पूर्णपणे असाधारण आणि जगातील पहिले मगर आहे, असा दावा गेटोरलँड ऑरलँडो यांनी फेसबुक पोस्टद्वारे केला आहे.
पार्कमधील अधिकाऱ्यांनी सांगितले की, “जगभरात केवळ आठ ल्युसिस्टिक मगरी आहेत, त्यापैकी तीन गॅटरलँडमध्ये राहतात. 'अमेरिकन मगरींमध्ये ल्युसिस्टिक मगर ही दुर्मिळ अनुवांशिक भिन्नता आहे. ते अल्बिनो मगरींपेक्षा खूप वेगळी आहे, ज्यांचे डोळे गुलाबी असतात. ल्युसिझममुळे मगरींमध्ये पांढरा रंग येतो. परंतु, त्यांच्या त्वचेवर सामान्य रंगाचे ठिपके असतात. या मगरी सूर्यप्रकाशात येत नाहीत. कारण त्यांची त्वचा सू्र्यप्रकाश सहन करु शकत नाही. अल्बिनो मगरींच्या गुलाबी डोळ्यांच्या तुलनेत ल्युसिस्टिक मगरींचे डोळे चमकदार निळे असतात.”
गेटोरलँडने पोस्टच्या कमेंट या पांढर्या मादी मगरीचे आणि तिच्या सामान्य रंगाच्या भावाची नावे सुचवण्याचे आवाहन केले आहे. व्हिडिओमध्ये मगरीची ही दोन गोंडस पिल्ले दिसत आहेत, जी सरड्यासारखी दिसत आहेत. गेटोरलँड ऑर्लॅंडो २०२४ मध्ये या नवजात पांढऱ्या रंगाची मगर लोकांसमोर आणण्याची योजना आखत आहेत, ज्यामुळे जगाला निसर्गाचे हे अनमोल आश्चर्य पाहण्याची संधी मिळेल.