मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: रात्रीच्या वेळी तरुणीच्या कारचा पाठलाग, धावत्या गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न, व्हिडिओ व्हायरल

Viral Video: रात्रीच्या वेळी तरुणीच्या कारचा पाठलाग, धावत्या गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न, व्हिडिओ व्हायरल

Apr 02, 2024 03:45 PM IST

Men Chasing woman car video : स्कूटरवरील तीन मुले कारमध्ये बसलेल्या मुलीवर राग व्यक्त करताना दिसत आहेत. ती तिला ओव्हारटेक करण्यासाठी पुढे जातात व तिचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न करतात.

तरुणीच्या कारचा पाठलाग
तरुणीच्या कारचा पाठलाग

बंगळुरुमध्ये एका महिलेच्या कारचा पाठलाग करताना तीन तरुणांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी कारवाई करत पोलिसांनी तीन तरुणांना अटक केली आहे. हे तीन जण स्कूटरवरून तरुणीच्या कारचा पाठलाग करत होते. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, तीन मुले एका कॅबचा पाठलाग करत आहेत तसेत कारच्या खिडक्यांवर हात आपटताना दिसत आहेत. तरुण गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे कारमध्ये बसलेली तरुणी खूपच घाबरली असून ती पोलिसांकडून जारी हेल्पलाइन नंबरवर कॉल करताना ऐकू येत आहे.

महिलेचे नाव प्रियम सिंह असल्याचे समजते. व्हिडिओमध्ये ती म्हणत आहे की, ते माझा पाठलाग करत आहेत. माझ्या गाडीवर बुक्क्या मारत आहेत. स्कूटरवरील तीन मुले कारमध्ये बसलेल्या मुलीवर राग व्यक्त करताना दिसत आहेत. ती तिला ओव्हारटेक करण्यासाठी पुढे जातात व तिचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न करतात. हे पाहून मुलगी रस्ता बदलते. त्यानंतरही ते तिचा पाठलाग सुरूच ठेवतात. प्रियम सिंह फोनवर म्हणत आहे की, ते मला शिव्या देत आहेत. माझ्या कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानंतर काही वेळाने ती आपली गाडी रस्त्याकडेला थांबवते.

ट्रेंडिंग न्यूज

महिलेने एक्सवर आपली पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, ही घटना सेंट जॉन्स हॉस्पिटलच्या गेट नंबर ५ जवळ घडली. रजिस्ट्रेशन नंबर KA04LK२५८३ असणाऱ्या स्कूटरवरून तीन हुल्लडबाज तरुणांनी माझी कार (KA५१MT५६५३) चा पाठलाग केला. त्यांनी होसुर रोड-कोरमंगला राइट टर्न जंक्शनपासून नागार्जुन रेस्टारंट केएचबी कॉलनी ५ वा ब्लॉक कोरमंगला पर्यंत त्यांनी पाठलाग केला. त्यांनी माझ्या कारच्या काचा तोडण्याचा प्रयत्न केला. भारतीय जनता पार्टी कर्नाटक यूनिटकडून हा व्हिडिओ एक्सवर शेअर करण्यात आला आहे. बीजेपीने या प्रकरणावरून काँग्रेस सरकारवर निशाणा साधत महिलांना सुरक्षा पुरवण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप केला आहे

WhatsApp channel
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर