Bengaluru viral news: रिक्षा चालक म्हटले की अनेकांना वाईट अनुभव असतो. उर्मट भाषा, प्रवाशांशी अरेरावी हे नेहमीचे चित्र असते. असाच काहीसा अभुभव पोलिसांच्या बाबतीत पण अनेकांना आलेला असतो. मात्र, बंगलोर येथे एका तरुणीला मात्र, काही वेगळाच अनुभव आला. हा अनुभव तिने सोशल मीडिया साईटवर शेयर केला असून तो आता व्हायरल होतो आहे.
Reddit या इंस्टाग्राम @paperbackdreams_ यूझरने तिचा अनुभव पोस्ट केला आहे. एका २६ वर्षीय तरुणी ही जुन्या मद्रास ते इंदिरानगर मार्गाने जात होती. यावेळी अचानक तिची बाईक ही बंद पडली. तीने तिची गाडी सुरू करण्यासाठी अनेक प्रयत्न केले मात्र, ती सुरू झाली नाही. यामुळे ही तरुणी चांगलीच भेदरली होती. एक तरुणी भर रस्त्यात हताशपणे उभी असल्याचे दोन पोलिसांनी पाहिले. या पोलिसांनी तातडीने त्या तरुणीला गाठत तिला नेमके काय झाले या बाबत विचारणा केली. पोलिसांनी तिची बंद पडलेली गाडी पाहिली. त्यांनी तिची गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडी सुरू झाली नाही.
यावेळी पोलिसांनी रस्त्यावरून जाणाऱ्या एका रिक्षा चालकाला हात दाखवत थांबण्यास सांगितले. दरम्यान, पोलिस गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, गाडी सुरू होऊ शकली नाही. यानंतर रिक्षा चालकाने गाडी सुरू करण्यास प्रयत्न केले. यानंतर मोठ्या प्रयत्नाने तरुणीची गाडी सुरू झाली. यानंतर मुलीने सर्वांचे आभार मानत पुढच्या प्रवासाला निघाली. दरम्यान, ही तरुणी स्वामी विवेकानंद सिग्नलपर्यंत गेली असता, तिची गाडी पुन्हा बंद पडली. दरम्यान, रिक्षा चालक हा तिच्या मागेच होता. त्याला तरुणीची गाडी पुन्हा बंद पडणार नाही याची खात्री करायची होती. तरुणीची बंद पडलेली गाडी पाहून रिक्षा चालक पुन्हा थांबला. त्याने पुन्हा तरुणीला मदत केली. मात्र, गाडी सुरू न झाल्याने रिक्षा चालक मेकॅनिकला आणण्यासाठी निघून गेला. दरम्यान ही तरुणी रस्त्याच्या कडेला एका विक्रेत्याकडे थांबली होती. यावेळी विक्रेता देखील तिची गाडी सुरू करण्यासाठी प्रयत्न करत होता.
आजूबाजूला जाणारे काही नागरिक देखील मुलीला पाहून थांबले. आणि गाडी सुरू करण्यासाठी मदत करू लागले. तब्बल १५ ते २० मिनिटे गाडी सुरू करण्याचे अनेकांचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, रिक्षा चालक हा एका मेकॅनिकसोबत परतला. मात्र, तो पर्यंत तरुणीची गाडी सुरू झाली होती. तरीही, निरोप घेण्यापूर्वी तिची बाईक पुन्हा थांबू नये याची खात्री करण्यासाठी रिक्षाचालक एक-दोन किलोमीटर तिच्या सोबत गेला. यानंतर दोघेही आपल्या दिशेने निघून गेले.
तरुणीने तिच्या मदतीसाठी आलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी कौतुक केले. या बाबत तिने एक पोस्ट देखील लिहिली. यावर तिचा अनुभव देखील तिने विस्तृतपणे सोशल मिडियावर शेयर केला. तिची ही पोस्ट व्हायरल झाली असून मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला नेटकऱ्यांनी दाद दिली आहे.