मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  'ओढणीचा असाही वापर...,' महिलेने स्कूटी चालवताना विना इअरफोन फोनवर बोलण्यासाठी केला भन्नाट ‘जुगाड’, VIDEO व्हायरल

'ओढणीचा असाही वापर...,' महिलेने स्कूटी चालवताना विना इअरफोन फोनवर बोलण्यासाठी केला भन्नाट ‘जुगाड’, VIDEO व्हायरल

Mar 28, 2024 01:56 PM IST

Viral Video : बेंगळुरुमधील एक व्हिडिओ लोकांना आश्चर्यचकीत करत आहे. या क्लिपमध्ये महिलेने स्कूटी चालवताना फोनवर बोलण्यासाठी असा जुगाड केला की लोक शॉक झाले.

फोनवर बोलण्यासाठी महिलेचा भन्नाट जुगाड, पाहा व्हिडिओ
फोनवर बोलण्यासाठी महिलेचा भन्नाट जुगाड, पाहा व्हिडिओ

आता माहिती व तंत्रज्ञानाच्या तसेच सोशल मीडियाच्या जमान्यात फोनविना आयुष्य अपूर्ण वाटते. आता लोक चालताना, खाताना, पिताना इतकेच काय वॉशरूममध्येही मोबाइलची स्क्रीन न्याहाळत असतात. अनेक लोक वाहन चालवतानाही मोबाइल फोनचा वापर करताना दिसतात. त्यातच आता बेंगळुरुमधील एक व्हिडिओ लोकांना आश्चर्यचकीत करत आहे. या क्लिपमध्ये महिलेने स्कूटी चालवताना फोनवर बोलण्यासाठी असा जुगाड केला की लोक शॉक झाले.

महिलेने आपल्या चेहऱ्यावर बांधलेल्या दुपट्ट्याने फोनला आधार दिला आहे. यामुळे फोन कानाला चिटकला आहे. विशेष म्हणजे महिलेने हेल्मेटही परिधान केलेले नाही. हे पाहून लोक हा खूप रिस्की जुगाड असल्याचे म्हणत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

हा व्हिडिओ मायक्रोब्लॉगिंग साइटX वर@ThirdEye नावाच्या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. याच्या कॅप्शनमध्ये लिहिले गेले की, वाहन चालवताना फोनवर बोलण्याची ही पद्धत आश्चर्यकारक आहे. हे दृष्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

बेंगळुरुमध्ये सर्व चौकात ट्रॅफिक पोलीस तैनात आहेत तसेच अनेक ठिकाणीAI कॅमेरे लावले आहेत. तरीही महिलेने हा जुगाड केला आहे. मला मसजत नाही की, हे इनोव्हेशन आहे की जुगाड, मात्र हे चुकीचे असल्याबरोबरच रिस्कीही आहे. त्यांनी बेंगळुरु ट्रॅफिक पोलीस@blrcitytraffic ला टॅग करताना सांगितले की, ही घटना २६ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास बेंगळुरुमधील विद्या रणापुरा परिसरातNTI ग्राउंडच्या समोर झाली होती.

WhatsApp channel
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर