Water Crisis: पिण्याच्या पाण्यानं गाडी धुतल्यास कारवाई, ३ दिवसांत १.१ लाख रुपयांचा दंड वसूल!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Water Crisis: पिण्याच्या पाण्यानं गाडी धुतल्यास कारवाई, ३ दिवसांत १.१ लाख रुपयांचा दंड वसूल!

Water Crisis: पिण्याच्या पाण्यानं गाडी धुतल्यास कारवाई, ३ दिवसांत १.१ लाख रुपयांचा दंड वसूल!

Published Mar 25, 2024 08:28 PM IST

Bengaluru Water Crisis: कार धुण्यासह अनावश्यक कारणांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात आहे.

कार धुण्यासाठी पिण्याचा वापर करताना आढळल्यास ५ हजारांचा दंड ठोठावला जाणार आहे.
कार धुण्यासाठी पिण्याचा वापर करताना आढळल्यास ५ हजारांचा दंड ठोठावला जाणार आहे.

Water Crisis News: पाणी टंचाईच्या काळात कार धुण्यासह अनावश्यक कारणांसाठी पिण्याचे पाणी वापरणाऱ्यांविरोधात बंगळुरू पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण मंडळाने कारवाईला सुरुवात केली आहे. बीडब्लूएसएसबीने आतापर्यंत २२ कुटुंबियांकडून १.१ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. राज्यात भीषण टंचाई असताना पाणी पुरवठा मंडळाच्या निर्देशाचे उल्लंघन केल्याबद्दल प्रत्येक कुटुंबाला ५ हजार रुपये दंड भरण्याचे निर्देश देण्यात आले.

बीडब्लूएसएसबीने गेल्या शुक्रवारपासून निर्बंध लागू केले. रविवारपर्यंत २२ जण निर्देशाचे उल्लंघन करताना आढळले. त्यांच्याविरोधात त्वरीत कारवाई करत त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला.बंगळुरूच्या आग्नेय विभागात बहुतेक उल्लंघनांची नोंद झाली. या भागातून एकूण तब्बल ६५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

बीडब्लूएसएसबीने या महिन्याच्या सुरुवातीला नागरिकांना पाणी टंचाईबाबत माहिती दिली. तसेच पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन केले होते. कार धुण्यासाठी, बांधकाम आणि करमणुकीच्या हेतूंसाठी पिण्याचा पाण्याचा वापर करू नये, अशी सूचना देण्यात आली. परंतु, त्यानंतरही पिण्याचा पाण्याचा वापर अनावश्यक कारणांसाठी केला जात असल्याचे निर्दशनास आले.

होळीच्या उत्सवादरम्यान कावेरी नदीचे पाणी पूल पार्टी आणि रेन डान्ससाठी न करण्याचे आदेश देण्यात आले.याव्यतिरिक्त, हॉटेल्स, अपार्टमेंट्स आणि उद्योगांसारख्या आस्थापनांना पाण्याचा वापर कमी करण्यास सांगितले गेले. महत्त्वाचे म्हणजे, बंगळुरु येथील नागरिक पाणीपुरवठ्यासाठी कावेरी नदी आणि भूजलावर अवलंबून आहेत. यावर्षी पावसाच्या अभावी भूगर्भातील पाण्याची पातळी लक्षणीयरीत्या खालावली आहे. सध्या बंगळुरूतील ११० गावांमध्ये ५० भूजल पाणी शिल्लक आहे. यात वरथूर, बेलांदूर, हुडी आणि मराठाहल्ली यांसारख्या पूर्वेकडील प्रदेशांचा समावेश आहे. नागरिकांना दररोज २६००- २८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र, पाणी टंचाईमुळे प्रतिदिन ५०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा कपात करण्यात आल्याचे बीडब्लूएसएसबीने माहिती दिली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर