मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Sia Godika : बेंगळुरूची सिया ठरली ‘ऑस्कर ऑफ सायन्स’ची मानकरी; तब्बल ४ लाख डॉलर्सचे बक्षीस जिंकले

Sia Godika : बेंगळुरूची सिया ठरली ‘ऑस्कर ऑफ सायन्स’ची मानकरी; तब्बल ४ लाख डॉलर्सचे बक्षीस जिंकले

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 07, 2024 09:01 AM IST

Breakthrough Junior Challenge 2023 International science-video competition : बेंगळूरुची सिया गोडिका या १७ वर्षीय मुलीने ब्रेकथ्रू ज्युनियर चॅलेंज 2023 ही मनाची स्पर्धा जिंकली असून ती तब्बल ४ लाख डॉलर्सच्या बक्षीसाची मानकरी ठरली आहे. ही स्पर्धा "ऑस्कर ऑफ सायन्स" समजली जाते.

सिया गोडिका
सिया गोडिका

Breakthrough Junior Challenge 2023 International science video competition : बेंगळुरू येथील सिया गोडिका या १७ वर्षीय मुलीने गुगलचे सह-संस्थापक सेर्गे ब्रिन, फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग आणि त्यांची पत्नी प्रिसिला चॅन, रशियन युरी मिलनर आणि त्यांची पत्नी प्रिसिला चॅन यांनी स्थापन केलेली ब्रेकथ्रू ज्युनियर चॅलेंज 2023 आंतरराष्ट्रीय विज्ञान-व्हिडिओ स्पर्धा जिंकली आहे. तब्बल ४ लाख डॉलर्सच्या बक्षीसाची सिया ही मानकरी ठरली आहे. तिच्या या यशामुळे तिचे कौतुक होत आहे.

Madhya Pradesh Fire : हरदा कारखाना दुर्घटनेतील मुख्य आरोपी राजेश अग्रवालला अटक, भीषण स्फोटाचे भयावह पाहा दृश

जीवन विज्ञान, भौतिकशास्त्र आणि गणितातील मूलभूत संकल्पनांच्या सर्जनशील विचार आणि संवाद कौशल्यांना प्रेरणा देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. ब्रेकथ्रू प्राइज फाउंडेशन अंतर्गत ५३ दशलक्ष बक्षीस असणाऱ्या ब्रेकथ्रू स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असून या स्पर्धांना "विज्ञानाचे ऑस्कर" समजले जाते.

इयत्ता १२ ची विद्यार्थिनी असलेल्या सियाने "यामनका फॅक्टर्स" या व्हिडिओसह ज्युनिअर गटातील स्पर्धा जिंकली आहे. यात तिने एका वृद्ध स्त्रीची भूमिका साकारली असून, ती पुन्हा तरुण होण्यासाठी वयाच्या मागे जाते. यात तिने नोबेल विजेत्या शिन्या यामानाकाच्या प्रेरित प्लुरिपोटेंट स्टेम सेल तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखवले.

California storm : कॅलिफोर्नियाला विध्वंसक वादळाचा तडाखा; मोठे नुकसान, हजारो घरात बत्तीगुल

सेल्युलर रीप्रोग्रामिंगवरील नोबेल पारितोषिक विजेते शिन्या यामानाका यांच्या शोधांचे स्पष्टीकरण देणाऱ्या तिच्या संशोधनाला २५०,००० डॉलर्सची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे, असे ब्रेकथ्रू प्राइज फाउंडेशनने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सियाचे विज्ञान शिक्षक अर्का मौलिक यांना पुरस्कारातील ५०,००० हजार डॉलर्स मिळणार आहे. तर सियाच्या शाळेतील प्रयोगशालेला कोल्ड स्प्रिंग हार्बर प्रयोगशाळेने डिझाइन केलेली तब्बल १००,००० डॉलर्सची लॅब मिळेल. तिने सादर केलेल्या व्हिडिओत वया संबंधित उपचारांवर कसे परिमाण होतात आणि डीजनरेटिव्ह रोगाची माहिती दिली आहे.

सीयाला या व्हिडिओची प्रेरणा तिच्या आजोबांना पाहून मिळाली. तिचे आजोबा हे कर्करोग आणि न्यूरोलॉजिकल आजाराने ग्रस्त असून त्यांचा या रोगाशी लढा पाहून तिला तिच्या प्रयोगाची प्रेरणा मिळाली. "सेल्युलर वृद्धत्व उलट केल्याने अनेक दुर्बल आजारांना प्रभावीपणे रोखता येते. भविष्यात हे संशोधनात प्रत्यक्षात आणण्याचा माझा निर्धार आहे, असे सीया पुरस्कार मिळाल्यानंतर म्हणाली. येणाऱ्या वसंत ऋतूत लेस एंजेलिस येथे एका समारंभात २०२३ ब्रेकथ्रू पुरस्कार विजेत्यांसोबत सीयाला हे बक्षीस दिले जाणार आहे. सहा वर्षांपूर्वी तिचा भाऊ समय गोडिका हा देखील या स्पर्धेचा विजेता ठरला होता. या वर्षी, ब्रेकथ्रू यंग चॅलेंजसाठी १०० देशातील २ हजार ४०० पेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.

WhatsApp channel