योग्य जीवनसाथी शोधणे ही खूप महत्त्वाची बाब असली तरी काही वेळा क्रिकेट सामन्याला प्राधान्य दिले जाते. बेंगळुरूच्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने शादी डॉट कॉम या मॅट्रिमोनियल प्लॅटफॉर्मवर असलेल्या एका तरुणीला मेसेज केला, मात्र तरुणीच्या क्रिकेटप्रेमी असणाऱ्या वडिलांनी असे काही उत्तर दिले की, याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
बेंगळुरू येथील २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअर राहुलने Shaadi.com प्लॅटफॉर्मवर प्रियांका नावाच्या तरुणीला मेसेज केला. स्वतःची ओळख करून दिल्यानंतर राहुलने वार्षिक ७० लाख रुपयांचे पॅकेज असल्याचे जाहीर केले आणि नम्रपणे आपल्या संदेशाचा शेवट या वाक्याने केला की "मला विश्वास आहे की आम्ही खूप एकमेकांनी अनुकूल असू."
"हॅलो, मी राहुल, बंगळुरूमधील सॉफ्टवेअर कंपनीत इंजिनिअर आहे. Shaadi.com वर तुमच्या मुलीचे प्रोफाईल पाहिले. सध्या मला वार्षिक ७० लाखांचे पॅकेज आहे. मला विश्वास आहे की आम्ही खूप सुसंगत असू, असे टाईप करून मुलीच्या वडिलांच्या उत्तराची वाट पाहू लागला.
राहुलला प्रियांकाच्या वडिलांकडून प्रतिसाद मिळाला आणि त्यांनी त्याला सांगितले की ते सामन्यानंतर अधिक बोलू शकतात.
"हॅलो, थँक्स! मी प्रियांकाचा बाप आहे. सामना संपल्यानंतर बोलुया, असे उत्तर वडिलांनी दिले.
मेसेजचा स्क्रीनशॉट राहुलची चुलत बहीण नैना हिने एक्सवर पोस्ट केला आहे. अवघ्या एका दिवसात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाच लाखांहून अधिक वेळा ही पोस्ट पाहिली गेली आहे. याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
कमेंट बॉक्समध्ये लोक या चॅटवर गंमतीशीर कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले की, आम्हाला प्रतिक्षा आहे की, सामन्यानंतर काय झाले?, दुसऱ्या एका युजरने म्हटले की, लग्न तर होत राहील, सामना थांबला नाही पाहिजे. अन्य एका यूजरने लिहिले की, असा मुलांसाठी दु:ख होते की, ज्यांना वाटते की, त्यांची किंमत केवळ त्यांच्या वार्षिक पॅकेजवर आहे.
अन्य एकाने म्हटले की, काकांचे प्राधान्यक्रम स्पष्ट होते. भारताने इंग्लंडला पराभूत केल्यानंतर बोलू शकतात. ' असे एका कमेंटरने टी-२० विश्वचषक २०२४ च्या भारत विरुद्ध इंग्लंड उपांत्य फेरीचा उल्लेख करताना लिहिले आहे, ज्यात भारताने ६८ धावांनी विजय मिळवला होता.
दरम्यान बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर शनिवारी रात्री अभारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना झाला. यात भारताने विजय मिळवून विश्वविजेतेपद मिळवले.
संबंधित बातम्या