Bengaluru Suicide News In Marathi: भारतासह संपूर्ण जगभरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत उजळल्याचे पाहायला मिळाले. एकीकडे हा उत्साह सुरू असताना दुसरीकडे एका होतकरू फोटोग्राफर तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली. मृत तरुणीच्या पालकांनी तिला नव्या वर्षाच्या फोटोशूटसाठी घराबाहेर जाण्यासाठी नकार दिला. यावर रागवलेल्या तरुणीने आत्महत्यासारखे टोकोचे पाऊल उचलले. ही घटना बंगळुरुत घडली.
मृत तरुणी बंगळुरुच्या एका खाजगी महाविद्यालयात बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिकत होती.तिला फोटोग्राफीची आवड होती. तिची आवड लक्षात घेता पालकांनी तिला फोटोग्राफीचे शिक्षण दिले. यामुळे मिळेल तिथे ती फोटो काढायची. नव्या वर्षाच्या निमित्ताने तिला बाहेर जाऊन फोटोग्राफी करायची होती. परंतु, या दिवशी फोटो बाहेर गर्दी असते. यामुळे पालकांनी तिला जाण्यास नकार दिला. यावर रागवलेल्या तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी मृत तरुणीच्या तरुणीने विल्सन गार्डन पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्शिनी आर असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तरुणीने तिच्या पालकांच्या मोबाईलमध्ये शेकडो फोटो काढले होते. तिची फोटोग्राफीची आवड लक्षात घेता तिच्या पालकांनी तिला फोटोग्राफीचं शिक्षण दिले. रविवारी, वार्शिनीने नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बाहेर जाऊन फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु, नव्या वर्षाच्या स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडतात. यामुळे बाहेर प्रचंड गर्दी असेल, असे सांगत वर्शिनीच्या पालकांनी दिला बाहेर जाण्यास नकार दिला. यावर वर्शिनी रागावली आणि तिच्या खोलीत निघून गेली. परंतु, तिने काही खाल्लं नाही म्हणून तिचे वडील तिला उठवायला गेले. परंतु, बाहेरून अनेकदा आवाज दिल्यानंतरही खोलीतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा त्यांनी दरवाजा तोडला. त्यावेळी वर्शिनी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. तिला त्वरीत जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.