Bengaluru Crime News : सतत मोबाईल वापराला विरोध केल्यामुळं संतापलेल्या एका शाळकरी मुलीनं इमारतीच्या २० व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. बेंगळुरूच्या वेशीवर असलेल्या कडुगोडी इथं ही घटना घडली आहे.
इंडो-एशियन न्यूज सर्व्हिसनं या संदर्भातील वृत्त दिलं आहे. अवंतिका चौरसिया असं मृत मुलीचं नाव असून ती दहावीत शिकत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचं कुटुंब मध्य प्रदेशातील होतं.
मृत मुलीचे वडील इंजिनीअर आणि आई गृहिणी आहे. ही मुलगी खासगी शाळेत शिकत होती आणि परीक्षेत तिला कमी गुण मिळाले होते. १५ फेब्रुवारीपासून वार्षिक परीक्षा सुरू होणार असल्यानं आई-वडील चिंतेत होते. परीक्षा जवळ येऊनही ती सतत मोबाईलवर वेळ घालवायची. त्यामुळं आई तिच्यावर चिडायची. मोबाईल वापराला तिनं विरोध केला होता. त्यामुळं चिडलेल्या तरुणीनं अपार्टमेंटच्या २० व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.
कडुगोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली. अद्याप पालकांचे अधिकृत जबाब अद्याप नोंदविण्यात आलेले नाहीत आणि या प्रकरणाबाबत अधिक चौकशी सुरू आहे.
ही मुलगी व्हाईटफिल्ड परिसरातील सीबीएसई शाळेत शिकत होती. परीक्षेच्या काळात मोबाइल वापरण्यास आईनं विरोध केल्यामुळं मुलीनं हे टोकाचं पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
बेंगळुरू विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेणारी २४ वर्षीय विद्यार्थिनी ४ फेब्रुवारी रोजी ज्ञानभारती कॅम्पसमधील वसतिगृहाच्या खोलीत मृतावस्थेत आढळली होती. ही मुलगी कन्नडमध्ये एम.ए.चे शिक्षण घेत होती व तिसऱ्या सेमिस्टरला होती आणि एच. डी. कोटे शहराजवळील एका गावातील रहिवासी होती.
संबंधित बातम्या