Ola auto driver News: जादा पैसे देण्यास नकार दिल्याने ओला चालकाचं प्रवाशासोबत धक्कादायक कृत्य
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Ola auto driver News: जादा पैसे देण्यास नकार दिल्याने ओला चालकाचं प्रवाशासोबत धक्कादायक कृत्य

Ola auto driver News: जादा पैसे देण्यास नकार दिल्याने ओला चालकाचं प्रवाशासोबत धक्कादायक कृत्य

Updated Mar 18, 2024 01:39 PM IST

Ola Auto Driver Threatened to Bengaluru Resident: जादा पैसे देण्यास नकार दिल्याने ओला चालकाने प्रवाशाला मारहाण करण्याची धमकी दिली. याप्रकरणी संबंधित प्रवाशाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

A Bengaluru resident shared a horrifying experience with an Ola driver.
A Bengaluru resident shared a horrifying experience with an Ola driver.

Ola Auto Driver News: एका रेडिट युजरने बेंगळुरूमधील ओला ड्रायव्हरसोबतचा 'भयानक अनुभव' शेअर केला आहे. ओला ड्रायव्हरने किंमतवाढीची मागणी केली, तेव्हा युजरने ती स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर ड्रायव्हरने त्याला धमकावण्यास सुरुवात केली. 

संबंधित प्रवाशाने रेडिटर केलेल्या आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, " मी घरी जाण्यासाठी ओला ऑटो बूक केली. त्यानंतर त्याने माझ्याकडे जादा पैसे मागितले. पण मी त्याला नकार दिला. मात्र, तरीही ओला ऑटोचालक माझ्या शेजारीच उभा राहिला आणि माझ्याशी भांडण करण्याचा प्रयत्न करू लागला. पण मी त्याला एकही शब्द न बोलता रॅपिडो बाईक बूक केली. त्यावेळी त्याने मला आणि रॅपिडो ड्रायवरला मारहाण करण्याची धमकी दिली. यामुळे मी माझ्या जवळच्या रोड जंक्शनकडे म्हणजे एचएसआरमधील बिपीन रावत चौकाकडे चालत जाऊ लागलो. पण तो देखील माझ्या पाठोपाठ येऊ लागला. रॅपिडो ड्रायव्हर आल्यानंतर ओला ऑटोचालकाने त्याच्या दुचाकीची चावी काढून घेतली आणि त्याच्याशी वाद घालू लागला.

तक्रारदाराने पुढे म्हटले की, ओला ऑटोचालक आणि इतर लोकांनी त्यांना घेरले. यानंतर त्याला पोलिसांना फोन करावा लागला.याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात असून पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.

दोन दिवसांपूर्वी रेडिटवर ही माहिती शेअर करण्यात आली. या पोस्टवर वापरकर्त्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. संबंधित ओला ऑटोचालकाविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणीने जोर धरला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर