Viral Video : विवाहबाह्य संबंधांचं बिंग फुटू नये म्हणून प्रियकरालाच अडकवलं, पण पोलीस चौकशीत सत्य बाहेर आलंच!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video : विवाहबाह्य संबंधांचं बिंग फुटू नये म्हणून प्रियकरालाच अडकवलं, पण पोलीस चौकशीत सत्य बाहेर आलंच!

Viral Video : विवाहबाह्य संबंधांचं बिंग फुटू नये म्हणून प्रियकरालाच अडकवलं, पण पोलीस चौकशीत सत्य बाहेर आलंच!

Jan 27, 2025 01:11 PM IST

Bengaluru Viral Video: बंगळुरुमध्ये एका महिलेने घरात गिझर बसवण्यासाठी आलेल्या व्यक्तीवर छुपा कॅमेरा लावल्याचा आरोप केला. परंतु, पोलीस चौकशीत हे सर्व आरोप खोटे ठरले.

आधी छुपा कॅमेराद्वारे ब्लॅकमेल केल्याचा आरोप, नंतर स्वत:च दिली विवाहबाह्य संबंधाची कबूली
आधी छुपा कॅमेराद्वारे ब्लॅकमेल केल्याचा आरोप, नंतर स्वत:च दिली विवाहबाह्य संबंधाची कबूली

Viral News: घरात गिझर बसवण्यासाठी आलेल्या व्यक्तीने त्यात छुपा कॅमेरा लावला आणि त्यातून मिळालेल्या खाजगी व्हिडिओद्वारे एका महिलेला ब्लॅकमेल केल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, या प्रकरणात पोलिसांना भलताच संशय आला. त्यांनी महिलेची कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. महिलेचे संबंधित व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध होते. याबाबत महिलेच्या नवऱ्याला समजल्यानंतर तिने स्वतःला वाचवण्यासाठी संबंधित व्यक्तीवर खोटे आरोप केले.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काहीजण एका दुचाकीस्वार व्यक्तीला अडवतात. या व्हिडिओत एक व्यक्ती असे सांगत आहे की, दुचाकीस्वारने आमच्या घरातील गिझरमध्ये छुपा कॅमेरा बसवून माझ्या पत्नीचे खासगी व्हिडिओ रेकॉर्ड केले. तसेच या व्हिडिओद्वारे तिला ब्लॅकमेल केले. हे ऐकताच आजूबाजूला जमलेले लोक संतापले आणि त्यांनी दुचाकीस्वारला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या महिलेनेही दुचाकीस्वारला चप्पलने मारले.

एका जबाबदार नागरिकाने गुन्हेगाराला पकडून तात्काळ पोलिसांच्या स्वाधीन केले आणि लोकांच्या गोपनीयतेवर गदा आणण्यासाठी आपल्या व्यवसायाचा गैरवापर करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी संशय व्यक्त केला. कारण गरम गिझरमध्ये कॅमेरा कसा काम करू शकतो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यानंतर पोलिसांनी महिलेची कसून चौकशी केली असता सत्य समोर आले.

महिलेने पोलिसांना सांगितले की, दुचाकीस्वार व्यक्तीसोबत तिचे विवाहबाह्य संबंध होते. यादरम्यान, तिनेच दुचाकीस्वारला आपले न्यूड फोटो पाठवले होते. परंतु, तिच्या विवाहबाह्य संबंधाबाबत तिच्या नवऱ्याला समजले. त्यावेळी महिलेने स्वत:ला वाचवण्यासाठी दुचाकीस्वारला फसवण्याचा प्रयत्न केला. दुचाकीस्वार तिला ब्लॅकमेला करायचा म्हणून ती त्याच्याशी संबंधात आली, असा आरोप केला होता. पोलिसांनी महिलेला तक्रार दाखल करण्यास सांगितले, पण तिने नकार दिला.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. परंतु, पोलीस चौकशीत सत्य उघड झाल्यानंतर नेटकऱ्यांनी महिलेबाबत राग व्यक्त केला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर