खळबळजनक..! दोन मुलींची हत्या करून आईने केली आत्महत्या, कामावरून परतल्यावर वडिलानींही संपवलं जीवन
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  खळबळजनक..! दोन मुलींची हत्या करून आईने केली आत्महत्या, कामावरून परतल्यावर वडिलानींही संपवलं जीवन

खळबळजनक..! दोन मुलींची हत्या करून आईने केली आत्महत्या, कामावरून परतल्यावर वडिलानींही संपवलं जीवन

Published Oct 15, 2024 05:35 PM IST

बेंगळुरूमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका २९ वर्षीय विवाहितेने आपल्या दोन मुलींची हत्या करून गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी पती घरी परतला असता सर्वांचे मृतदेह पाहून त्यानेही आत्महत्या केली.

दोन मुलींची हत्या करून महिलेची आत्महत्या
दोन मुलींची हत्या करून महिलेची आत्महत्या

बेंगळुरूमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका २९ वर्षीय विवाहितेने आपल्या दोन मुलींची हत्या करून गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी पती घरी परतला असता सर्वांचे मृतदेह पाहून त्यानेही आत्महत्या केली. रविवारी दुपारी उत्तर बेंगळुरूच्या एका घरात ही घटना घडली. 

मृतांमध्ये अविनाश, त्याची पत्नी ममता, मुली अनन्या आणि अधीरा यांचा समावेश आहे. एक मुलगी दोन वर्षांची तर दुसरी चार वर्षांची होती. हे कुटुंब मूळचे कलबुर्गी जिल्ह्यातील असून गेल्या सहा वर्षांपासून ते बेंगळुरू येथे वास्तव्यास होते. कौटुंबिक वादातून महिलेने असे पाऊल उचलले असावे,  असा अंदाज पोलिसांनी अंदाज आहे. पुढे पत्नी आणि मुलांच्या मृत्यूने अविनाश इतका व्यथित झाला की, त्यानेही आपले जीवन संपवले.

ही घटना सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता उघडकीस आली. अविनाशचा धाकटा भाऊ उदयकुमार घरी पोहोचला असता अविनाशचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.  त्याची पत्नी व दोन मुलींचे मृतदेह पलंगावर पडले होते. उदय एका शाळेत फिजिकल एज्युकेशन ट्रेनर असून तो अविनाशसोबत राहत होता.  

काही दिवसापूर्वी तो कलबुर्गी येथील आपल्या गावी गेला होता आणि सोमवारी परतले. पोलिसांनी ममताविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. बेंगळुरूचे डीएसपी सीके बाबा म्हणाले की, शवविच्छेदनानंतर मुलांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. त्याने सांगितले की, अविनाश सकाळपासून रात्रीपर्यंत कामावर होता. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.

अविनाशचा चुलत भाऊ दत्तू राठोड याने या आत्महत्या कौटुंबिक वादातून झाल्या नसल्याचा दावा केला आहे. आठ दिवसांपूर्वी अविनाशने काकांना फोन करून क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी मदत मागितली होती. आम्हाला संशय आहे की कोणीतरी त्यांच्यावर बिल भरण्यासाठी दबाव आणत होते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर