मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Metro Viral Video: मेट्रो कर्मचाऱ्याचं घृणास्पद कृत्य; महिला प्रवाशासमोर हस्तमैथुन करतानाचा व्हिडिओ व्हायरल!

Metro Viral Video: मेट्रो कर्मचाऱ्याचं घृणास्पद कृत्य; महिला प्रवाशासमोर हस्तमैथुन करतानाचा व्हिडिओ व्हायरल!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 21, 2024 06:00 PM IST

Bengaluru metro security guard Viral Video: बंगळुरू मेट्रो स्थानकावर सुरक्षारक्षकाने महिला प्रवाशासमोर हस्तमैथून केल्याची संतापजनक घटना घडली आहे.

बंगळुरू मेट्रो स्थानकावर महिला प्रवाशाला पाहून सुरक्षारक्षकाने हस्तमैथून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
बंगळुरू मेट्रो स्थानकावर महिला प्रवाशाला पाहून सुरक्षारक्षकाने हस्तमैथून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Bengaluru metro Viral Video: बेंगळुरु येथील मेट्रो स्थानकावरील सुरक्षारक्षकाने एका महिला प्रवाशाला पाहून हस्तमैथून केल्याची धक्कादायक घटना घडली. संबंधित महिलेने संपूर्ण प्रकार मोबाईच्या कॅमऱ्यामध्ये कैद केला. यानंतर महिलेने आरोपी सुरक्षारक्षाविरोधात मेट्रो प्राधिकरणाकडे तक्रार दाखल केली. बेंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने आरोपी सुरक्षा कर्मचाऱ्याला निलंबित केल्याची माहिती दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १७ मार्च २०२४ रोजी ग्रीन लाईनवरील जलहल्ली मेट्रो स्टेशनवर घडली. महिलेने तक्रारीत लिहिले आहे की, "जलाहल्ली मेट्रो स्टेशनवर दुपारी अडीच वाजताच्या सुमारास एक सुरक्षा रक्षक माझ्याकडे सतत एकटक पाहत होता. तो मला पाहून त्याच्या प्रायव्हेट पार्ट्सला स्पर्श करू लागला. मी सुरक्षा रक्षकास विचारण्याचा प्रयत्न केल्यानंतरही तो माझ्याकडे पाहतच राहिला. त्यानंतर मी व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली." या घटनेनंतर महिलेने सुरक्षारक्षकाविरोधात मेट्रो प्राधिकरणाकडे तक्रार दिली. परंतु, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळल्याने पोलिसांत तक्रार दाखल केली.

मंगळवारी, मोहित बिश्नोई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका सोशल मीडिया वापरकर्त्याने महिलेच्या दोन्ही तक्रारींचे स्क्रीनशॉट पोस्ट केले. तसेच महिलेच्या तक्रारीकडे मेट्रो प्राधिकरणाने दुर्लक्ष केल्याची माहिती दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत.

यापूर्वी तेलंगणातील वारंगल जिल्ह्यातील नेक्कोंडा भागातील आंबेडकर सेंटरजवळ आईस्क्रीम विकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत आईस्क्रीम विक्रेता दिवसाढवळ्या हस्तमैथून करताना दिसत आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी आईस्क्रीम विक्रेत्याला अटक केली.भारतीय दंड संहिताच्या कलम २९४ नुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

IPL_Entry_Point

विभाग